आठवडाभरात चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील कायमच्या गायब! रात्री झोपण्याआधी त्वचेवर लावा 'हे' नॅचरल क्रीम, दिसाल सुंदर
हिवाळ्यात त्वचेवर रॅश का येतात?
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी?
नाईट क्रीम बनवण्याची कृती?
वय वाढल्यानंतर त्वचेसंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागणे, त्वचा खूप जास्त कोरडी पडणे, बारीक रेषा, वांग इत्यादी अनेक त्वचेसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर चेहऱ्यावरील ग्लो पूर्णपणे कमी होऊन जातो. थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात वाढलेल्या गारव्यामुळे त्वचा अधिकच निस्तेज आणि कोरडी होऊन जाते. त्वचेवर पांढरेपणा वाढून चेहरा लाल होणे, रॅश येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. कधी फेसपॅक लावला जातो तर कधी फेसमास्क लावून त्वचेची काळजी घेतली जाते. पण वारंवार स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्वचा बाहेरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे सुद्धा जास्त आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
हिवाळ्यात भासणार नाही महागड्या स्किन केअर प्रॉडक्टची गरज, ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा कोरफड जेल
थंडीत चेहऱ्यावर वाढलेल्या कोरडेपणामुळे त्वचा खूप जास्त निस्तेज वाटू लागते. वातावरणातील बदलामुळे त्वचेतील नैसर्गिक आर्द्रता कमी होऊन चेहरा सुकल्यासारखा वाटतो. तासनतास घराबाहेर राहणे, गरम पाण्याचा वापर, त्वचेची व्यवस्थित काळजी न घेणे, सतत वेगवेगळ्या फेशवॉशचा वापर करणे इत्यादी चुकांमुळे त्वचा खूप जास्त खराब होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला थंडीत चेहऱ्यावर दिसू लागणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी नॅचरल क्रीम बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. नैसर्गिक पदार्थांचा वापर केल्यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि हायड्रेट राहते. याशिवाय चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतो.
चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी रात्रीचे योग्य स्किन केअर रुटीन फॉलो करणे आवश्यक आहे. यासाठी रात्री झोपण्याआधी वारंवार केमिकल क्रीमचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांपासून बनवलेल्या क्रीमचा वापर करावा. यासाठी कोरफडीचा गर, बदाम तेल, गुलाब पाणी, ग्लिसरीन आणि विटामिन ई कॅप्सूल इत्यादी गोष्टींची आवश्यकता आहे.
पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेवर होणारे परिणाम! जाणून घ्या
नाईट क्रीम घरी बनवताना सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात कोरफड जेल, गुलाबपाणी, बदाम तेल, ग्लिसरीन आणि विटामिन ई कॅप्सूल घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण व्यवस्थित फेटून झाल्यानंतर क्रीम तयार होईल. पदार्थांचा रंगहलकासा हिरवा झाल्यानंतर तयार केलेली क्रीम बंद झाकणाच्या डब्यात भरून ठेवा. रात्री झोपण्याआधी नियमित चेहरा पाण्याने स्वच्छ करून झाल्यानंतर तयार केलेली क्रीम लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवर वाढलेला ड्रायनेस, सुरकुत्या आणि त्वचेसंबंधित बऱ्याच समस्या दूर होतील. महागड्या क्रीम त्वचेला खोलवर पोषण देत नाहीत. पण घरगुती पदार्थांचा वापर केल्यास त्वचा दीर्घकाळ हायड्रेड आणि सुंदर राहते.






