Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला मिळेल गारवा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबटगोड चिंच पन्ह, नोट करून घ्या रेसिपी

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी चिंच पन्ह बनवावे. यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होण्यासोबतच आरोग्य सुधारते. चला तर जाणून घेऊया चिंच पन्ह बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 31, 2026 | 03:20 PM
कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला मिळेल गारवा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबटगोड चिंच पन्ह

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला मिळेल गारवा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबटगोड चिंच पन्ह

Follow Us
Follow Us:

आंबटगोड चवीची चिंच पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चिंच खायला खूप जास्त आवडतात. विविध भाज्या आणि जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी चिंचेचा वापर केला जातो. चिंच केवळ चवीसाठीच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहेत. विटामिन सी आणि इतर आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध असलेली चिंच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडाव्याची खूप जास्त आवश्यकता असते. अशावेळी कायमच विकतच्या ज्यूसचे किंवा कोल्ड्रिंकचे सेवन करण्याऐवजी चिंच पन्हचे सेवन करावे. चिंच पन्ह बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यात तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. कडाक्याच्या उन्हाळ्यात घरी पाहुणे आल्यानंतर त्यांना चहा देण्याऐवजी चिंच पन्ह पिण्यास द्यावे. यामुळे पाहुण्यांना खूप जास्त फ्रेश वाटेल आणि शरीर सुद्धा हायड्रेट राहील. आठवड्यातून एकदा तरी आंबटगोड पदार्थांचा आहारात समावेश करावा. कारण यामुळे शरीराला सुद्धा फायदे होतात. चला तर जाणून घेऊया चिंच पन्ह बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Summer Special : आंब्यांचा सीजन संपायच्या आत घरी बनवा ‘मँगो रसमलाई’, याची चव कुटुंबातील सर्वांनाच करेल खुश

साहित्य:

  • चिंच
  • जिऱ्याची पावडर
  • बर्फाचे तुकडे
  • मीठ
  • काळे मीठ
  • चाट मसाला
  • सुंठ पावडर
  • पाणी
  • गूळ
मैद्याचे मोमोज खाऊन कंटाळा आला? मग झटपट घरी बनवा कमी कॅलरी असलेले राईस पेपर मोमोज, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • चिंच पन्ह बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात एक ग्लास पाणी गरम करून घ्या. पाणी कोमट झाल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार चिंच घालून अर्धा तास झाकण मारून तसेच ठेवा.
  • दुसऱ्या वाटीमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात गूळ सुद्धा भिजत ठेवा. यामुळे गुळाच्या गुठळ्या पूर्णपणे मोडून जातील आणि पाणी तयार होईल.
  • पाण्यात भिजत ठेवलेली चिंच मऊ झाल्यानंतर हाताने मॅश करा आणि त्यातील बिया वेगळ्या करून घ्या.
  • पूर्णपणे मऊ मिश्रण झाल्यानंतर चाळणीच्या मदतीने चिंच गाळून घ्या. त्यानंतर मोठ्या टोपात तयार केलेला चिंच गर आणि गुळाचे पाणी एकत्र करून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात बर्फाचे तुकडे घाला. मिक्स केल्यानंतर चाट मसाला, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, काळे मीठ, साधे मीठ आणि आवडीनुसार पुदिन्याची पाने घालून मिक्स करा.
  • तयार केलेले पन्ह खूप जास्त थंड्गार हवे असल्यास फ्रिजमध्ये ठेवून द्या. ग्लासच्या कडांना मसाला आणि मीठ लावून त्यात तयार केलेले चिंच पन्ह ओतून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले थंडगार चिंच पन्ह.

Web Title: In the harsh summer the body will get cold make sweet and sour tamarind panh quickly in 10 minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • easy food recipes
  • summer drink
  • summer heat

संबंधित बातम्या

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
1

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
2

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ
3

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी
4

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.