यंदाच्या दिवाळीमध्ये चेहऱ्यावर येईल तेजस्वी ग्लो! मसूर डाळीचा वापर करून 'या' सोप्या पद्धतीमध्ये बनवा फेसपॅक
हल्ली सोशल मीडियावर अनेक कोरियन स्किन केअर, वेगवेगळे प्रॉडक्ट इत्यादी अनेक गोष्टीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. सुंदर दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी कोरियन फेसपॅक तर कधी स्किन ब्राइटनिंग ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. पण यामुळे चेहऱ्यावर काही काळापुरताच चेहऱ्यावर ग्लो येतो. चेहऱ्यावर वारंवार चुकीचे स्किन केअर प्रॉडक्ट लावल्यामुळे त्वचेची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते. दिवाळी सणाच्या आधी सर्वच महिला पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशिअल, क्लीनअप इत्यादी अनेक वेगवेगळ्या गोष्टी करतात. पण यामुळे चेहऱ्यावर फारसा ग्लो दिसून येत नाही. सुंदर दिसण्यासाठी केवळ स्किन केअरचा वापर न करता घरगुती पदार्थांचा सुद्धा वापर करावा.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या डाळीचा वापर तुम्ही करू शकता. दूध, मसूर डाळ, हळद, बेसन आणि चंदनचा वापर करून बनवलेला फेसपॅक त्वचेसाठी वरदान ठरेल. चेहऱ्यावर फेसपॅक लावण्यासोबतच आहारात बदल करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. आहारात होणाऱ्या बदलांमुळे त्वचा अधिकच सुंदर आणि चमकदार होते. आज आम्ही तुम्हाला मसूर डाळीचा वापर करून फेसपॅक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचेच्या सौंदर्यात भर पडेल.
मसूर डाळीचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मसूर डाळ पाण्यात काहीवेळ भिजत ठेवा. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली डाळ आणि थोडस पाणी घालून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात बेसन, हळद, चंदन आणि दूध घालून घालून फेसपॅक तयार करा. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळा तसाच ठेवा. ३० मिनिटं झाल्यानंतर फेसपॅक पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावर वाढलेला टॅनिंग, पिंपल्स इत्यादी सर्वच समस्यांपासून सुटका मिळते. हा फेसपॅक नियमित वापरल्यास चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल आणि त्वचा अधिक सुंदर दिसेल.
प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही फेसपॅक लावण्याआधी चेहऱ्यावर पॅच टेस्ट करून पाहणे आवश्यक आहे. अन्यथा त्वचेचे नुकसान होते. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी बाजारातील कोणत्याही स्किन ब्राइटनिंग क्रीमचा किंवा लोशनचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक पदार्थांचा वापर करून बनवलेला फेसपॅक वापरावा. दुधामध्ये असलेल्या लॅटिक ऍसिडमुळे त्वचेवर जमा झालेल्या मृत पेशी नष्ट होऊन जातात. याशिवाय हळदीमध्ये असलेले नैसर्गिक घटक चेवरील दाह, पिंपल्स किंवा पुरळ कमी करण्यात मदत करतात.