चेहऱ्यावरील पिंपल्स- टॅनिंग कायमचे होईल दूर! सुंदर त्वचेसाठी 'या' पद्धतीने करा तुरटीचा वापर
सणावाराच्या दिवसांमध्ये प्रत्येकालाच सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. पण कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चेहऱ्यावर पिंपल्स, काळे डाग किंवा टॅनिंग वाढू लागते. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि पिंपल्स कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट आणि स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण तरीसुद्धा चेहऱ्यावर ग्लो येत नाही. सुंदर दिसण्यासाठी केवळ महागडे प्रॉडक्ट नाहीतर पोषण आहार, शांत झोप आणि पचनक्रिया निरोगी असणे आवश्यक आहे. पचनाची समस्या निर्माण झाल्यानंतर चेहऱ्यावर भरपूर पिंपल्स येतात. याशिवाय मोठ्या पिंपल्समुळे त्वचेला हानी पोहचते. त्यामुळे चेहऱ्याची योग्य काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)
बऱ्याचदा धूळ, माती, प्रदूषण इत्यादींच्या सानिध्यात दीर्घकाळ राहिल्यामुळे चेहऱ्यावर घाणीचा चिकट थर जमा होऊन त्वचा अतिशय तेलकट होऊन जाते. तेलकट त्वचा योग्य वेळी स्वच्छ न केल्यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण जमा होऊन जाते, ज्यामुळे मोठे मोठे पिंपल्स फोड येण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी तुरटीचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. तुरटीचा वापर संपूर्ण आरोग्यासाठी केला जातो. यामुळे शरीराची कार्य सुधारतात.
तुरटीचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, तवा गरम करून त्यावर तुरटीची पावडर भाजून घ्या. त्यानंतर हळूहळू तुरटीला पाणी सुटेल आणि वाफ येईल. त्यानंतर तुरटी पावडर काढून त्यात मुलतानी माती मिक्स करा. पेस्ट बनवण्यासाठी तयार केलेल्या मिश्रणात गुलाब पाणी मिक्स करून पेस्ट बनवून घ्या. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर वाढलेली डेड स्किन, काळे डाग आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होईल.तुरटीचा फेसपॅक १० ते १५ मिनिटं हाताने चोळून घ्या. यामुळे त्वचेवर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील. तयानंतर पाण्याने त्वचा धुवून घ्या.
तुरटीचा फेसमास्क चेहऱ्यावर लावून स्वच्छ धुवून घेतल्यानंतर माॅईश्चराईजर लावणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेमधील कोरडेपणा कमी होतो आणि चेहरा हायड्रेट राहतो. तुरटीच्या वापरल्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात आणि त्वचा डागविरहित दिसते . याशिवाय संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी तुरटीचा वापर करण्याआधी पॅच टेस्ट करावी. अन्यथा त्वचेला हानी पोहचू शकते.