निस्तेज केसांवर येईल चमकदार शाईन! भाऊबीजेआधी केसांना लावा 'या' पांढऱ्या पदार्थापासून बनवलेला हेअर मास्क
राज्यासह संपूर्ण देशभरात दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या आधी घरात साफसफाई करून फराळ बनवला जातो. याशिवाय घरात अनेक मिठाईचे पदार्थ बनवले जातात. यासोबतच सुंदर दिसण्यासाठी नवीन कपडे, मेकअप, स्किन केअर, हेअर केअर इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे बऱ्याचदा केसांचे सौंदर्य कमी होऊन जाते. केस अतिशय निस्तेज आणि कोरडे पडतात. केस कोरडे झाल्यानंतर केसांची चमक वाढवण्यासाठी वेगवेगळ्या हेअर केअर ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. मात्र यामुळे काही दिवस केस अतिशय चमकदार आणि सुंदर दिसतात. मात्र कालांतराने पुन्हा एकदा केसांचे सौंदर्य नष्ट होऊन जाते. त्यामुळे केस सुंदर आणि चमकदार करण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा.(फोटो सौजन्य – istock)
केसांची हरवलेली चमक पुन्हा मिळवण्यासाठी कायमच केमिकल ट्रीटमेंट, हेअर केअर प्रॉडक्ट इत्यादींचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. याशिवाय केसांना वरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांवरील चमक वाढण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करून हेअर मास्क बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हेअर मास्क केसांवर लावल्यामुळे केस अतिशय चमकदार आणि सुंदर होतात. या हेअर मास्कचा वापर केल्यामुळे केसांवर चमकदार शाईन येईल.
आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांच्या मुळांवर खोबऱ्याचे तेल लावावे. खोबऱ्याच्या तेलामुळे केसांना पोषण मिळते आणि केस सुंदर होतात. यामुळे केसांची चमक वाढते आणि केसांच्या समस्या कमी होऊन जातात. केळ्यामध्ये नैसर्गिक तेल, कार्बोहायड्रेट्स आणि जीवनसत्त्वे इत्यादी अनेक घटक आढळून येतात, ज्यामुळे केसांमध्ये आर्द्रता कायम टिकून राहते आणि केस मऊ सुंदर दिसतात. विटामिन ई कँप्सूलचा वापर केस आणि त्वचेसाठी केला जातो.






