Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी घरच्या घरी बनवा तिरंगी ढोकळा; चव आणि लूक दोन्ही भन्नाट

Tri Color Dhokla Recipe : १५ ऑगस्टचा दिवस जवळ येऊन ठेपला असून हा दिवस भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. देशभरात बा दिवस साजरा करण्यासाठी अनेक खास कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, जागोजागी तिरंगा फडकवला जातो. स्वातंत्र्याचा हा दिवस तुम्ही एका खास रेसिपीनेही साजरा करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 08, 2026 | 10:19 AM
Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी घरच्या घरी बनवा तिरंगी ढोकळा; चव आणि लूक दोन्ही भन्नाट

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी घरच्या घरी बनवा तिरंगी ढोकळा; चव आणि लूक दोन्ही भन्नाट

Follow Us
Follow Us:
  • १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिवस.
  • हा दिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
  • या खास दिवशी तुम्ही खास रेसिपी ट्राय करु शकता.
स्वातंत्र्यदिनाच्या खास सेलिब्रेशनसाठी नेहमीच्या ढोकळ्याला द्या तिरंग्याचा सुंदर रंग. केशरी, पांढरा आणि हिरवा अशा तीन रंगांच्या थरांमध्ये तयार केलेला हा तिरंगा ढोकळा दिसायला आकर्षक तर आहेच, शिवाय चहासोबत किंवा सकाळच्या नाश्त्यासाठीही उत्तम पर्याय ठरतो. १५ ऑगस्टच्या दिवशी घरच्या घरी हा पदार्थ बनवून दिवसाचा गोडवा आणखी वाढवला जाऊ शकतो. वेगवेगळ्या रंगांसाठी नैसर्गिक भाज्या आणि हिरव्या पालेभाज्यांचा वापर केल्यामुळे ढोकळ्याला आकर्षक रंगासोबतच चवही मिळते. चला तर मग जाणून घेऊया तिरंगा ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी.

सध्या सर्वत्र चर्चेत असलेलं सावजी मटण नेमकं कसं बनतं? ‘ही’ आहे पारंपरिक रेसिपी

तिरंगा ढोकळा बनवण्यासाठी साहित्य

पिठासाठी :

  • बेसन – २ कप
  • रवा – २ टेबलस्पून
  • दही – १ कप
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • मीठ – चवीनुसार
  • साखर – १ टीस्पून
  • लिंबाचा रस – १ टेबलस्पून
  • इनो फ्रूट सॉल्ट – १ टीस्पून
केशरी थरासाठी :
  • गाजराची प्युरी – २ ते ३ टेबलस्पून
  • लाल तिखट – चिमूटभर
हिरव्या थरासाठी :
  • पालकाची प्युरी – २ ते ३ टेबलस्पून
  • हिरवी मिरची – १
फोडणीसाठी :
  • तेल – १ टेबलस्पून
  • मोहरी – १ टीस्पून
  • तीळ – १ टीस्पून
  • कढीपत्ता – ७ ते ८ पाने
  • हिरवी मिरची – २ उभ्या चिरलेल्या
  • पाणी – २ टेबलस्पून
  • तिरंगा ढोकला बनवण्याची
भाजी काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा झणझणीत राजस्थानी ‘डुमरी तडका चटणी’, एकदा खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

कृती

  • एका मोठ्या भांड्यात बेसन, रवा, दही, मीठ आणि साखर घ्या. त्यात थोडे थोडे पाणी घालून गाठी न राहता मध्यम घट्टसर पीठ तयार करा. हे मिश्रण साधारण १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा.
  • तयार पीठ तीन समान भागांमध्ये वेगळे करा. एका भागात गाजराची प्युरी आणि थोडे लाल तिखट मिसळा.
  • दुसऱ्या भागात पालकाची प्युरी आणि हिरवी मिरची मिसळा. तिसरा भाग साधाच ठेवा. गरज असल्यास प्रत्येक मिश्रणाची घट्टता थोडी पाण्याने समायोजित करा.
  • ढोकळ्याच्या भांड्यात किंवा मोठ्या स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. एका गोल किंवा चौकोनी ताटलीला थोडे तेल लावून तयार ठेवा.
  • हिरव्या पिठात अर्धा चमचा इनो घालून हलक्या हाताने मिसळा. लगेच हे मिश्रण तेल लावलेल्या ताटलीत पसरवा. गरम स्टीमरमध्ये साधारण ५ ते ७ मिनिटे वाफवा.
  • हिरवा थर थोडा सेट झाल्यावर त्यावर साध्या पिठात इनो मिसळून सावधपणे पसरवा. पुन्हा ५ ते ७ मिनिटे वाफवा. थर एकमेकांत मिसळणार नाहीत याची काळजी घ्या.
  • शेवटी गाजराच्या प्युरीचे मिश्रण तयार करून त्यात इनो मिसळा आणि पांढऱ्या थरावर समान पसरवा. झाकण ठेवून आणखी ८ ते १० मिनिटे वाफवा. सुरी किंवा टूथपिक टोचून पाहिल्यावर ती स्वच्छ बाहेर आली तर ढोकळा तयार आहे.
  • ढोकळा थोडा थंड झाल्यावर चौकोनी किंवा आवडीच्या आकारात कापा. कढईत तेल गरम करून मोहरी, तीळ, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीची फोडणी करा. त्यात थोडे पाणी घालून ही फोडणी ढोकळ्यावर पसरवा. कोथिंबीर आणि नारळाने सजवून तिरंगा ढोकळा सर्व्ह करा.

Web Title: Independence day 2026 make tasty and unique tricolor dhokla at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 10:19 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
1

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
2

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल
3

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.