
जेवणाच्या ताटात असायला हव्यात 'या' शक्तिशाली भाज्या, अशक्तपणा कमी होण्यासोबतच शरीराला मिळेल आवश्यक पोषण
Indian Vegetables: दैनंदिन आहारात कायमच वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. कामाच्या धावपळीमध्ये बऱ्याचदा जेवण बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. पण नेहमीच तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. धावपळीची जीवनशैली आणि कामाच्या वाढत्या तणावामुळे शरीरसंबंधित आजार वाढू लागले आहेत. खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे, रक्तदाब, मधुमेह, विटामिन बी १२ कमी होणे इत्यादी वेगवेगळ्या समस्या वाढू लागतात. शरीरातील आवश्यक विटामिनची पातळी कमी झाल्यानंतर खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. तर काहीवेळा हात पाय थंड पडणे, शरीर थकून गेल्यासारखे वाटणे, छातीत जळजळ इत्यादी वेगवेगळ्या समस्या वाढू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात या भाज्यांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – istock)
पालकमध्ये मुबलक प्रमाणात फोलेट, लोह, क्लोरोफिल इत्यादी घटक आढळून येतात. हे घटक शरीरातील लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आवश्यक ठरतात. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा पालकचे सेवन करावे. पालकच्या सेवनामुळे शरीरात वाढलेला थकवा आणि अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी आणि थकवा कमी करण्यासाठी पालकचे सेवन करावे. पालकाची भाजी, सूप किंवा डाळ-पालक अशा विविध पद्धतीने तुम्ही पालकचे सेवन करू शकता. यामुळे शरीराची नैसर्गिक ऊर्जा वाढण्यास मदत होते.
महिलांच्या आरोग्यासाठी शेवग्याच्या शेंगा वरदान ठरतात. या पानांमध्ये विटामिन, कॅल्शियम, लोह आणि फोलेट भरपूर प्रमाणात आढळून येतात. शेवग्याच्या शेंगांमध्ये असलेले घटक रक्त वाढवण्यास मदत करतात. शेवग्याच्या पानांची भाजी किंवा शेवग्याच्या शेंगांचे सूप बनवून खाऊ शकता. यामुळे विटामिन बी १२ ची पातळी वाढवण्यास मदत होते.
शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात बीट खाण्याचा सल्ला कायमच दिला जातो. बीटमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स, फोलेट आणि मँगनीजसारखे अनेक घटक आढळून येतात. नियमित किंवा आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा आहारात बीटचा रस किंवा शिजवलेले बीट खाल्ल्यास रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. यामध्ये असलेले घटक शरीराला आवश्यक पोषण देतात.
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना मेथीची भाजी खायला अजिबात आवडत नाही. पण या भाजीमध्ये असलेले आवश्यक पोषक घटक शरीरासाठी प्रभावी ठरतात. मेथीच्या पानांमध्ये लोह, मॅग्नेशियम आणि फोलेट इत्यादी घटक असतात. त्यामुळे मेथीच्या पानांच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट किंवा खोबऱ्याचा किस टाकून भाजी बनवू शकता.
Ans: पालक, मेथी, शेवग्याची पाने, गाजर, बीट, भोपळा, ब्रोकोली आणि विविध हंगामी भाज्यांचा आहारात समावेश करता येतो. प्रत्येक भाजीमध्ये वेगवेगळी जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असते.
Ans: पालक, मेथी आणि शेवग्याच्या पानांमध्ये लोहासह विविध पोषक घटक असतात. मात्र, भाज्यांमधील लोह शरीरात तुलनेने कमी प्रमाणात शोषले जाते.
Ans: बीटमध्ये फोलेट, फायबर आणि इतर पोषक घटक असतात; मात्र त्यात लोहाचे प्रमाण फार जास्त नसते. हिमोग्लोबिन कमी असल्यास केवळ बीटवर अवलंबून न राहता डॉक्टरांच्या सल्ल्याने कारण शोधणे आणि योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.