
दहा मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबट गोड चवीचे बंगाली चाट चूरमूर
भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये बनवले जाणारे चविष्ट पदार्थ चाखण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक भारतात येतात. भेळ, शेवपुरी, आलू चाट, पापडी चाट इत्यादी अनेक पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. त्यात बंगालमधील अतिशय फेमस पदार्थ म्हणजे चूरमूर. चूरमूर चाट खायला खवय्यांची मोठी गर्दी असते. आंबट गोड चवीचे बंगाली चूरमूर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडते. या पदार्थाची चव आंबट खारट आणि काहीशी तिखट असते. बंगालमधील मसालेदार चाट बनवण्यासाठी पाणीपुरीच्या पुऱ्यांचा चुरा, चणे, उकडलेले बटाटे, कांदा इत्यादी अनेक पदार्थ वापरून चाट बनवले जाते. बऱ्याचदा संध्याकाळच्या वेळी काहींना काही चविष्ट आणि चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. कोलकात्याच्या रस्त्यांवर आणि छोट्या गल्लीमध्ये चूरमूर चाट मिळते. चला तर जाणून घेऊया बंगाली चूरमूर चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
चायनीज लव्हर्स आहात? मग बाहेरून कशाला यंदा घरीच बनवा चविष्ट अशी ‘सोया चिली’