फॅमिली पार्टीसाठी करा चमचमीत बेत! सोप्या पद्धतीने घरी बनवा हॉटेल स्टाईल व्हेज तवा पुलाव
दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात काहींना काही चमचमीत आणि झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास नेमकं काय बनवावं? असे अनेक प्रश्न महिलांना कायमच पडतात. रात्रीच्या जेवणात कायमच वरण भात, भाजी चपाती खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. दिवाळी पार्टी किंवा वाढदिवसाच्या पार्टीचे नियोजन केल्यानंतर कायमच हॉटेलमध्ये जाऊन जेवण केले जाते. कारण घरात पार्टीसाठी काय बनवावे, हे सुचत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घरी आलेल्या पाहुण्यांसाठी हॉटेल स्टाईल तवा पुलाव बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मुंबईच्या स्ट्रीटवर मिळणारा तवा पुलाव सगळीकडे खूप जास्त फेमस आहे. वेगवेगळ्या भाज्या आणि पांढऱ्या भातापासून बनवलेला तवा पुलाव सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतो. चला तर जाणून घेऊया तवा पुलाव बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा विष्ट ‘पनीर डोसा’, शरीरात दीर्घकाळ टिकून राहील ऊर्जा






