रात्री अचानक लागलेली भूक भागवण्यासाठी बिस्कीट खाण्याऐवजी करा 'या' पदार्थाचे सेवन
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला ताण, रात्री उशिरापर्यंत जागे राहणे इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. बऱ्याचदा रात्रीच्या वेळीमोबाईल बघत जाग राहिल्यामुळे अनेकांना अचानक भूक लागते. भूक लागल्यानंतर नेमकं काय खावं असे अनेक प्रश्न सगळ्यांचं नेहमी पडतात. भूक लागल्यानंतर बिस्कीट, ब्रेड किंवा चिवडा इत्यादी पदार्थ खाल्ले जातात. तर काही लोक रात्री उठल्यानंतर मॅगी किंवा पास्ता बनवून खातात. पण या पदार्थांचे रात्रीच्या वेळी सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. बिस्कीट किंवा मैद्यापासून बनवलेले पदार्थ पचनास अतिशय जड असतात. त्यामुळे रात्री जंक फूड खाणे टाळावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रात्रीच्या वेळी लागलेली छोटी मोठी भूक भागवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
दिवसभरात कोणत्याही वेळी भूक लागल्यानंतर तुम्ही मखानाचे सेवन करू शकता. या पदार्थाचे सेवन केल्यामुळे रात्रीच्या वेळी चांगली झोप लागते. याशिवाय झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. यामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि अँटी-ऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. कमी कॅलरीजयुक्त पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतात. रात्री भूक लागल्यानंतर तुम्ही मूठभर मखाणा पोट भरलेले राहील. तसेच शरीर आणि मनाला अनेक फायदे होतील.
झोपेची गुणवत्ता बिघडल्यानंतर रात्रीच्या वेळी लवकर झोप येत नाही. याशिवाय मानसिक तणाव वाढल्यानंतर सुद्धा ही समस्या उद्भवू लागते. म्हणूनच आहारात झोपेची गुणवत्ता सुधारणाऱ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. राजगिऱ्याच्या लाडूचे किंवा चिक्कीचे तुम्ही आहारात सेवन करू शकता. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. राजगिऱ्यामध्ये असलेले फायबर आणि बीटा-ग्लुकन कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. राजगिरा खाल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
बदाम खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये मॅग्नेशियम, विटामिन ई आणि निरोगी चरबीयुक्त अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे तुम्ही भिजवलेले किंवा भाजलेले बदाम खाऊ शकता. तोंडाची चव वाढवण्यासाठी भिजवलेल्या बदामाचे सेवन करावे. छोटी मोठी भूक भागवण्यासाठी तुम्ही भिजवलेले किंवा भाजलेले बदाम खाऊ शकता.
अंडी खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. अंड्याचे सेवन केल्यामुळे शरीराला प्रोटीन मिळते. याशिवाय यामध्ये असलेल्या घटकांमुळे भूक नियंत्रणात राहते आणि लवकर भूक लागत नाही. अंड्यामध्ये प्रथिने, निरोगी चरबी आणि अनेक आवश्यक इत्यादी अनेक घटक आढळून येतात.