लिव्हर खराब झाल्यानंतर पायांमध्ये दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
चुकीची लाईफस्टाईल, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, व्यायामाचा अभाव, सतत अल्कोहोलचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. लिव्हर शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. मात्र लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. लिव्हर खराब झाल्यानंतर डोळे, पाय आणि त्वचेमध्ये अनेक बदल दिसून येतात. पायांना सूज येणे, त्वचेचा रंग बदलणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरात टॉक्सिन्स तसेच साचून राहतात, ज्यामुळे शरीर शुद्ध होत नाही. हेच टॉक्सिन शरीराच्या अनेक अवयवांवर गंभीर परिणाम करतात. त्यामुळे लिव्हर निरोगी असणे आवश्यक आहे. लिव्हर सिरोसिस, फॅटी लिव्हर, किंवा लिव्हर फेल्युअर इत्यादी समस्या उद्भवू लागल्यानंतर पायांमध्ये अनेक बदल दिसून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लिव्हर खराब झाल्यानंतर पायांमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात प्रामुख्याने दिसून येणारी समस्या म्हणजे पायांना आलेली सूज. लिव्हरच्या कार्यात बिघाड झाल्यानंतर शरीरात पाणी साचून राहण्यास सुरुवात होते. लिव्हर सिरोसिसमध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी झाल्यामुळे रक्तातील द्रवपदार्थ बाहेर पडून जातात, ज्यामुळे पायांना मोठ्या प्रमाणावर सूज येऊ लागते. पायांच्या टाचांपासून ते अगदी पायांच्या घोट्यांपर्यंत सूज येऊन वेदना होऊ लागतात.
लिव्हर झाल्यानंतर पायांमध्ये वेदना होऊ लागतात.लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात, ज्यामुळे शरीर आणि रक्तातील विषारी घटक बाहेर पडून जात नाहीत. यामुळे सतत पायांमध्ये सतत जडपणा, चालताना अशक्तपणा जाणवू लागतो. सतत काम करत राहिल्यामुळे सुद्धा शरीरात थकवा निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच रात्रीच्या वेळी झोपताना योग्य झोप येत नसल्यास लिव्हरची तपासणी करून घ्यावी.
हाताचे तापमान उलगडत असते तुमच्या आतड्यांच्या आरोग्याचे रहस्य; जाणून घ्या काय सांगत आहे गट हेल्थ
लिव्हर शऱूरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. लिव्हर खराब झाल्यानंतर त्वचा पिवळी पडू लागते. योग्य वेळी पिवळ्या झालेल्या त्वचेकडे लक्ष दिल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे . चेहरा, डोळे , हात आणि पाय पूर्णपणे पिवळे दिसू लागतात. यासोबतच अंगाला खाज येऊ लागते. तर काहींना रात्रीच्या वेळी पायांच्या तळव्यांना खाज येऊ लागते. हातापायांना अचानक मुंग्या येऊ लागतात. शरीराच्या रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात.