आतड्यांमध्ये कॅन्सरच्या गाठी झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येणारी लक्षणे:
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप, वारंवार बिघडलेली पचनक्रिया, व्यायामाचा अभाव, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा गंभीर परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शरीरात होणारे छोटे बदल मोठ्या आजारांचे कारण ठरतात. यामध्ये सगळ्यात गंभीर असलेला आजार म्हणजे कॅन्सर. कॅन्सरचे नाव ऐकल्यानंतर सुद्धा अनेकांच्या पायाखालील जमीनच सरकून जाते. कॅन्सर झाल्यानंतर शरीरात अतिशय सामान्य लक्षणे दिसू लागतात. मात्र हीच सामान्य लक्षणे मोठे आजार उद्भवण्यासाठी कारणीभूत ठरतात. शरीरातील कोणत्याही अवयवाला कॅन्सर होण्याची शक्यता असते.
कोलन किंवा कोलोरेक्टल कॅन्सरला आतड्यांचा कॅन्सर असे म्हणतात. भारतामध्ये आतड्यांच्या कॅन्सरचे सार्वधिक रुग्ण आढळून येतात. या कॅन्सरच्या रुग्ण संख्येत भारताचा सातवा क्रमांक आहे. जीवनशैलीमध्ये होणाऱ्या बदलांमुळे ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये या कॅन्सरचा धोका जास्त आढळून येतो. तर वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्येसुद्धा हा कॅन्सर वाढत आहे. आतड्यांमध्ये कॅन्सरच्या गाठी तयार झालेल्या पोटात आणि पाठीमध्ये असह्य वेदना होऊ लागतात. शरीरात कोणतीही गंभीर लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये कॅन्सरच्या गाठी झाल्यानंतर शरीर कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
शरीरातील विषारी पदार्थ मोठ्या आतड्यांमधून बाहेर पडून जातात. मात्र आतड्यांमध्ये कॅन्सरच्या गाठी झाल्यानंतर मल असामान्यपणे पातळ असल्याचे दिसून येते. याशिवाय आतड्यांमध्ये वेदना होऊ लागतात. मोठ्या आतड्यांमधील मांस बाहेर येण्यास सुरुवात होते. त्यामुळे या गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
आतड्यांमध्ये कॅन्सरच्या गाठी झाल्यानंतर पोटात सतत जड जाड वाटू लागते. शौचालयानंतरही पोट व्यवस्थित रिकामे झाल्यासारखे वाटत नाही. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. शरीरामध्ये अतिशय सामान्य दिसणारी लक्षणे आतड्यांचे कॅन्सरचे प्रमुख लक्षणं असतात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
महिलांमधील बायपास सर्जरी! हृदयविकारासाठी बायपास शस्त्रक्रिया म्हणजे अमुल्य जीवन वाचवणारी प्रक्रिया
शरीरातील कोणत्याही भागात कॅन्सरच्या गाठी झाल्यानंतर पाठीमध्ये वेदना होऊ लागतात. पाठीमध्ये वेदना झाल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात, मात्र असे न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मोठ्या आतड्यांमध्ये ट्यूमर झाल्यानंतर शरीराच्या नसांवर दबाव येतो, ज्यामुळे पाठीमध्ये वेदना होतात. आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर वेळीच उपचार करावे.