उन्हाळा असो की पावसाळा सर्वच ऋतूंमध्ये केसांची योग्यरीत्या काळजी घेणे आवश्यक असतं. उन्हाळ्यामध्ये केसांसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. केस गळणे, कोंडा होणे, अचानक तुटणे यांसारख्या अनेक समस्या या दिवसांमध्ये जाणवू लागतात. त्यामुळे त्वचा आणि केसांच्या आरोग्याकडे लक्ष देणं फार महत्वाचे आहे. केसांमुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिक खुलून दिसते. केसांच्या आरोग्याची काळजी घेतल्यानंतर अनेक समस्या सुटतात.
केस आणि त्वचेला पुरेशा प्रमाणात पोषक घटक मिळाल्यानंतर त्वचा आणि केसांसंबंधित अनेक समस्या सहज सुटतात. अनेकदा प्रदूषण, धूळ आणि इतर काही कारणांमुळे केस खराब होण्याची शक्यता असते. केस गळतीची समस्या वाढल्यानंतर आपण बाजारात मिळणारे महागडे शॅम्पू किंवा इतर काही प्रॉडक्ट वापरतो. पण याचा जास्त काळ आपल्या केसांवर परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे बाजारात मिळणारे महागडे शॅम्पू वापरण्यापेक्षा सल्फेट फ्री शॅम्पू वापरणे गरजेचे आहे. केसांच्या वाढीसाठी सल्फेट मुक्त शॅम्पू का महत्वाचा आहे? चला तर जाणून घेऊया फायदे..
[read_also content=”ब्लशऐवजी तुम्हीसुद्धा लिपस्टिक लावता का? यामुळे होऊ शकतं त्वचेचं नुकसान https://www.navarashtra.com/lifestyle/do-you-also-wear-lipstick-instead-of-blush-this-can-cause-skin-damage-nrsk-535366.html”]
सल्फेटचा केसांवर काय परिणाम होतो:
केसांच्या वाढीसाठी सल्फेट युक्त शॅम्पू वापरणे आवश्यक आहे.सोडियम लॉरिल सल्फेट आणि सोडियम लॉरेथ सल्फेट हे दोन प्रकारचे सल्फेट प्रामुख्याने बाजारात मिळणाऱ्या शॅम्पूमध्ये आढळून येतात.सल्फेटपासून साबण तयार केला जातो. यामुळे टाळूवरील घाण आणि केसांमध्ये असलेले तेल काढून टाकण्यासाठी मदत होते. सल्फेटचा वापर टाळूवरील तेल काढून टाकण्यासाठी केला जातो. पण सल्फेटच्या अतिवापरामुळे कोरडेपणा, टाळूमध्ये जळजळ आणि केसांची मुळे कमकुवत होण्याची शक्यता असते. तसेच रंग केलेल्या केसांना यामुळे हानी पोहचू शकते. त्यामुळे आजकाल सल्फेट फ्री शॅम्पू फ्री शॅम्पू वापरले जातात. या शॅम्पूमध्ये नारळ किंवा वनस्पतींच्या तेलाचा वापर शॅम्पू बनवण्यासाठी केला जातो. अशाप्रकारे शॅम्पू वापरल्याने टाळूला कोणतीही इजा न होता केस स्वच्छ होतात.
[read_also content=”मानसिक शांतता आणि आर्थिक अडचणींमुळे त्रस्त आहात तर दुधाचे हे ४ उपाय करा https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-are-suffering-from-mental-peace-and-financial-problems-try-these-4-milk-remedie-535499.html”]
सल्फेट मुक्त शॅम्पू वापरण्याचे फायदे: