जास्वंदीची लाल फुले केसांसाठी ठरतील वरदान! खोबऱ्याच्या तेलात मिक्स करताच केसांवर दिसेल कमाल
हल्ली लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच केस गळतीची समस्या उद्भवते. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर काहीवेळा टक्कल पडेल की काय अशी भीती सुद्धा मनात निर्माण होते. केसांच्या समस्या उद्भवल्यानंतर महिला सतत दुर्लक्ष करतात. पण असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे. बऱ्याचदा केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागडे ट्रीटमेंट, शॅम्पू, सीरम इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात. पण वारंवार महागड्या हेअर ट्रीटमेंट केल्यामुळे केस चांगले होण्याऐवजी आणखीनच खराब होऊन जातात. केसांना वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून त्रास देण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. केसांच्या वाढीसाठी नैसर्गिक उपाय अतिशय गुणकारी ठरतात. यामुळे केसांच्या समस्या दूर होतात आणि केसांवर नैसर्गिक चमक वाढते.(फोटो सौजन्य – istock)
जया किशोरी त्वचा कायमच हायड्रेट ठेवण्यासाठी चेहऱ्यावर लावतात ‘हा’ ब्युटी स्प्रे, दीर्घकाळ दिसाल तरुण
जास्वंदीच्या फुलाचा वापर देव घरातील पूजेसाठी केला जातो. यासोबतच केसांच्या वाढीसाठी सुद्धा तुम्ही जास्वदींच्या फुलांचा वापर करू शकता. बाजारात जास्वदींच्या फुलांचे तेल मिळते. जास्वंदीमध्ये असलेल्या पोषक घटकांचा केसांना खूप जास्त फायदा होतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांच्या निरोगी वाढीसाठी तुम्ही खोबऱ्याच्या तेलात जास्वदींच्या फुलांचे तेल टाकून मिक्स करू शकता. आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी जास्वदींच्या फुलांचे हेअर ग्रोथ ऑइल बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. यामुळे केस लांब आणि सुंदर होतात.
केसांच्या वाढीसाठी जादुई तेल बनवण्यासाठी खोबऱ्याचे तेल, जास्वदींची फुले एवढच साहित्य लागणार आहे. यामुळे केसांची झपाट्याने वाढ होईल आणि केस अतिशय सुंदर दिसाल. तेल बनवण्यासाठी सर्वप्रथम जास्वदींची फुले आणि पाने पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. धुवून घेतलेली पाने कोरडी करा. त्यानंतर मोठ्या वाटीमध्ये खोबऱ्याचे तेल गरम करून त्यात जास्वदींची फुले आणि पाने टाकून तेल व्यवस्थित गरम करून घ्या. १० मिनिट तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅसद बंद करून तेल थंड होण्यासाठी ठेवा. जास्वदींची तेल बनवताना त्यात तेलाचे सर्व गुणधर्म उतरतील.
केसांच्या वाढीसाठी तयार केलेले तेल आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांवर लावावे. यामुळे केसांच्या मुळांना योग्य पोषण मिळेल आणि केस अतिशय सुंदर होतील. केस स्वच्छ धुवण्याआधी केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत सगळीकडे केस लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे टाळूवरील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल आणि केस अतिशय घनदाट सुंदर दिसतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्या. जास्वंदीच्या पानांफुलांमध्ये, प्रोटीन, अमीनो ॲसिड, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे केसांच्या मुळांना भरपूर पोषण मिळते.