Skin care routine फॉलो करून सुद्धा चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? मग 'हे' असू शकते कारण
सुंदर दिसण्यासाठी महिला त्वचेवर खूप जास्त काळजी घेतात. कधी स्किन केअर रुटीनमध्ये बदल, तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या फेसमास्कचा वापर करून त्वचेची काळजी घेतली जाते. स्किन केअर रुटीनमध्ये बदल झाल्यानंतर चेहऱ्याला हानी पोहचते. त्यामुळे सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी परफेक्ट स्किनकेअर रुटीन, महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स, घरगुती पारंपरिक उपाय इत्यादी गोष्टी वेळच्या वेळी केल्यास त्वचा कायमच चमकदार राहते. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे त्वचा अतिशय चिकट आणि तेलकट होऊन जाते. चेहऱ्यावर जमा झालेली घाण त्वचेच्या छिद्रांमध्ये जाऊन बसते, ज्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. पण काहीवेळा योग्य स्किन केअर फॉलो करून सुद्धा चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल्स आणि मुरूम येतात. याला कारणीभूत ठरतात रोजच्या वापरातील घाणेरडी, मळकी बेडशीट किंवा चादर इत्यादींमुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)
रात्री झोपण्यासाठी घरात उशी, चादर, बेडशीट किंवा इतरही अनेक गोष्टींचा वापर केला जातो. यामुळे अंगावरची घाण ब्लँकेटमध्ये तशीच साचून राहते. धूळ, घाम, तेल आणि बॅक्टेरिया चादरीमध्ये साचून राहिल्यामुळे त्वचेमध्ये प्रवेश करतात, ज्याचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. त्वचेच्या छिद्रांमध्ये बॅक्टरीया साचून राहिल्यामुळे त्वचेला हानी पोहचते आणि काहीवेळा चेहऱ्यावर सतत पिंपल्स येणे, मुरूम आणि फंगल इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे घरातील चादर, बेडशीट, उशी इत्यादी गोष्टी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला रोजच्या वापरातील चादर आणि बेडशिटमुळे त्वचेचे आरोग्य कसे बिघडते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत
सर्वच महिला स्किन केअर रुटीन फॉलो करतात. स्किन केअरमध्ये वेगवेगळ्या क्रीम, लोशन लावले जातात. हे सर्व प्रॉडक्ट चादर शोषून घेते. ज्यामुळे बॅक्टरीया आणि बुरशीयुक्त घटक त्वचेच्या छिद्रांमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे बेडशीट व्यवस्थित स्वच्छ न धुतल्यास घाण वारंवार चेहऱ्यामध्ये प्रवेश करते. त्वचेच्या छिद्रांमध्ये साचून राहिलेल्या घाणीमुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरुमांचे मोठे मोठे फोड येतात. याशिवाय त्वचेची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते.
अंगावर घेण्याची चादर, बेडशीट, उशी कव्हर आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा स्वच्छ धुवणे आवश्यक आहे. यामुळे घाणेरड्या बेडशीटमुळे त्वचेचे नुकसान होत नाही. तुम्हाला जर घाम किंवा चेहऱ्यावर जास्त तेल जमा होत एक दिवस आड करून चादर बदलणे आवश्यक आहे. कारण तेलकट चेहऱ्यामध्ये बॅक्टरीया लगेच साचुन राहतात. बेडशीट स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा. गरम पाण्याच्या वापरामुळे बॅक्टरीया लवकर नष्ट होतात आणि त्वचेला कोणतीही हानी पोहचत नाही. याशिवाय कॉटन किंवा सिल्क फॅब्रिकच्या बेडशीट आणि उशी कव्हरचा वापर करावा.