Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वारंवार पोटात दुखत? पावसाळ्यात उद्भवू शकते कावीळची समस्या, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

कावीळ झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे दिसतातच तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. आज आम्ही तुम्हाला कावीळ झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसतात, जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 03, 2025 | 09:51 AM
वारंवार पोटात दुखत? पावसाळ्यात उद्भवू शकते कावीळची समस्या

वारंवार पोटात दुखत? पावसाळ्यात उद्भवू शकते कावीळची समस्या

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे वातावरणात अनेक बदल दिसून येतात. या दिवसांमध्ये साथीच्या आजरांची मोठ्या प्रमाणावर लागण होते. साथीचे आजार पसरू लागल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती हळूहळू कमकुवत होऊन जाते. त्यामुळे या दिवसांमध्ये आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. कावीळ झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कामुकवात होऊन जाते. ज्यामुळे सतत चक्कर येणे, अशक्तपणा वाटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. काविळ म्हणजे पीलिया लिव्हरसंबंधित आजार. कावीळ झाल्यानंतर डोळ्यांखाली पांढरा आणि पिवळ्या रंगाची त्वचा दिसू लागते. याशिवाय शरीरामध्ये बिलीरूबिन नावाच्या पिवळ्या घटकाची वाढ होते. कावीळ झाल्यानंतर डोळे देखील पिवळे पडू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)

भारतामध्ये मधुमेहाच्या रुग्ण संख्येत वाढ! रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू नये म्हणून नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन

शरीरात वाढलेले बिलीरूबीन पित्तामध्ये मिक्स होते आणि संपूर्ण शरीराच्या पचनक्रियेमध्ये जाते. प्रामुख्याने ते विष्ठेच्या माध्यमातून शरीरातून बाहेर पडून जाते. पण शरीरात साचून राहिलेले बिलीरूबीन लिव्हर आणि पित्त नलिकांमधून लवकर बाहेर पडून गेले नाहीतर शरीरात रक्तामध्ये जमा होऊ लागते. तसेच डोळे, त्वचा, नख इत्यादी शरीराचे अवयव पिवळे दिसू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कावीळ झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? यावर कोणते उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास शरीरात जमा झालेली कावीळ कमी होईल.

कावीळ झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे:

  • त्वचा रंग पिवळसर दिसणे
  • डोळ्यांखाली भाग पांढरा दिसणे
  • थंडी ताप
  • पिवळ्या गडद रंगाची लघवी
  • उलट्या किंवा विष्टेमधून रक्त पडणे
  • वारंवार पोटात दुखणे

कावीळ होण्याची कारणे:

पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कावीळ होण्यामागे अनेक कारणे आहेत. गोळ्या औषधांचे सेवन, जेनेटिक मेटाबोलिज्म डिसऑर्डर, पित्ताशयात स्टोन किंवा सूज, पित्ताशयाचा कॅन्सर, अग्नाशयाचा कॅन्सर, डायबिटीस, लठ्ठपणा, नॉन-अल्कोहल फॅटी लिव्हर इत्यादी गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात कावीळ जमा होण्यास सुरुवात होते.

कावीळ झाल्यानंतर आराम मिळवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?

प्रोटीन असलेले पदार्थ:

दैनंदिन आहारात शरीराला आवश्यक असलेल्या सर्वच पदार्थांचे नियमित सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. आहारात प्रोटीन, फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास तात्काळ आराम मिळेल. प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्यामुळे एंझाइमची निर्मिती चांगली होते. ज्यामुळे शरीरात हार्मोन्स संतुलित राहतात. लिव्हरच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन करावे. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.

‘या’ पद्धतीने जेवण बनवणे पडले दीपिका कक्कडला महागात, बेतले जीवावर; लिव्हर कॅन्सरची लक्षणे माहीत करून घ्या

विटामिन:

निरोगी आरोग्यासाठी शरीराला सर्वच विटामिनची आवश्यकता असते. विटामिन सी शरीर आणि त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करते. आंबट फळांमध्ये इलेक्ट्रोलाइट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे शरीर कायम हायड्रेट राहते. जांभळं, पपई, अ‍ॅवोकाडो, खरबूज आणि द्राक्ष इत्यादी आंबट फळांचे नियमित सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Jaundice problem may occur during rainy season jaundice symptoms and causes health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 09:51 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy food
  • monsoon care

संबंधित बातम्या

Menstrual Health: महिलांनो, Period Cramps ने हैराण झाला आहात? ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास वाढू शकतात पोटात वेदना
1

Menstrual Health: महिलांनो, Period Cramps ने हैराण झाला आहात? ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास वाढू शकतात पोटात वेदना

शरीरात नेहमी थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? आहारात समाविष्ट करा ‘हे’ ५ पदार्थ; मॅग्नेशियमची कमी होईल दूर
2

शरीरात नेहमी थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? आहारात समाविष्ट करा ‘हे’ ५ पदार्थ; मॅग्नेशियमची कमी होईल दूर

Exercise For Seniors: वाढत्या वयात फक्त वॉकिंग पुरेसे नाही! ज्येष्ठांनी ‘या’ एक्सरसाइजचा नक्की दैनंदिन जीवनशैलीत करावा समावेश
3

Exercise For Seniors: वाढत्या वयात फक्त वॉकिंग पुरेसे नाही! ज्येष्ठांनी ‘या’ एक्सरसाइजचा नक्की दैनंदिन जीवनशैलीत करावा समावेश

Health Care Tips: हातापायांना कायमच सूज येते? किडनीपासून हृदयापर्यंत ‘या’ कारणांमुळे पायाला येऊ शकते सूज
4

Health Care Tips: हातापायांना कायमच सूज येते? किडनीपासून हृदयापर्यंत ‘या’ कारणांमुळे पायाला येऊ शकते सूज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.