जया किशोरी त्वचा कायमच हायड्रेट ठेवण्यासाठी चेहऱ्यावर लावतात 'हा' ब्युटी स्प्रे
सर्वच महिलांना आपली त्वचा कायमच सुंदर आणि हायड्रेट हवी असते. त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट, ब्युटी प्रॉडक्ट, स्किन केअरचा वापर केला जातो. पण वारंवार केमिकल युक्त स्किन केअरचा वापर केल्यामुळे त्वचेला हानी पोहचते. सुंदर दिसण्यासाठी कायमच स्किन केअर किंवा महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी संतुलित आहार, शरीरास आवश्यक असलेली झोप आणि व्यायाम केल्यास चेहऱ्यावर सुंदर ग्लो येईल. प्रसिद्ध कथावाचक जया किशोरी त्यांच्या कथांसाठी आणि भजनांसाठी प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील ग्लो पाहून अनेक लोक भारावून जातात. जया किशोरी सुंदर दिसण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर नेमकं काय लावतात? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं कायमच पडत्ता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जया किशोरी यांचे ब्युटी रहस्य सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)
जया किशोरी त्यांच्या स्किन केअर रुटीनमध्ये घरगुती पदार्थांचा वापर करतात. घरगुती पदार्थ त्वचा कायमच हायड्रेट आणि ग्लोइंग ठेवतात. जया किशोरी यांनी स्किन केअर रुटीनबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. घरगुती पदार्थांचा वापर करून बनवलेले स्प्रे त्या कायमच वापरतात. हा स्प्रे २ मिनिटांमध्ये झटपट तयार होतो. यामुळे चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स.
चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन काढून टाकण्यासाठी स्किन स्किन एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे. धूळ, माती, प्रदूषण इत्यादींमुळे त्वचा खूप जास्त काळवंडून जाते, ज्यामुळे चेहरा काळा दिसू लागतो. घरगुती स्क्रब तयार करण्यासाठी वाटीमध्ये बेसन, हळद आणि दही घेऊन पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट व्यवस्थित मिक्स करून चेहऱ्यावर लावा.त्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे डेड स्किन कमी होण्यासोबतच चेहऱ्यावरील ग्लो वाढण्यास मदत होईल. हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केल्यास त्वचा अतिशय सुंदर होईल.
कोरियन महिला तांदळाच्या पाण्यापासून बनवलेल्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र कायमच बाजारातील स्किन केअर वापरण्यापेक्षा घरी बनवलेल्या स्प्रेचा वापर करून त्वचेची गुणवत्ता सुधारावी. स्प्रे बनवण्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात उकळवून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळा. तयार केलेले पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. हा स्प्रे नियमित त्वचेवर मारल्यास त्वचा अधिकच सुंदर आणि चमकदार होईल. तांदळाच्या पाण्याचा टोनर म्हणून वापर केल्यास त्वचा अतिशय सुंदर होईल.
त्वचेसाठी मॉईश्चरायजर अतिशय महत्वाचे आहे. यामुळे त्वचा कायमच मऊ राहते. याशिवाय चेहऱ्यावर आलेल्या लाईन्स, सुरकुत्या, त्वचेमधील जळजळ आणि त्वचेचा रंग सुधारण्यासाठी मॉईश्चरायजर लावणे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे नियमित चेहऱ्यावर मॉईश्चरायजर लावावे. याशिवाय सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी सनस्क्रीन लावावे. सनस्क्रीन न लावता जास्तवेळ बाहेर राहिल्यास त्वचा काळी होऊ शकते.