वय वाढल्यानंतर चेहऱ्यावरील सौंदर्य खुलून दिसण्यासाठी 'या' घरगुती पदार्थाचा करा वापर
वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, डोळ्यांखाली वाढलेले काळे डाग, पिगमेंटेशन, पिंपल्स, फोड इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचा अतिशय वयस्कर वाटू लागते. त्यामुळे तरुण वयातच त्वचेवरील ग्लो निघून जातो. त्वचेची योग्य काळजी न घेतल्यामुळे त्वचेसंबंधित समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवू लागतात. याशिवाय धूळ, माती, प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण साचून राहिल्यामुळे पिंपल्स किंवा मोठे फोड येतात. चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचा रखरखीत आणि खडबडीत होऊन जाते. चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण यामुळे त्वचा आणखीनच खराब होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थाचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
अपुऱ्या झोपेमुळे किंवा शरीरात वाढलेल्या मानसिक तणावामुळे डोळ्यांखाली सुरकुत्या येण्यासोबतच डोळे अतिशय काळे होऊन जातात. डोळ्यांखाली आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी काही महिला मेकअप करतात. पण मेकअप केल्यामुळे सुरकुत्या हाईड होण्याऐवजी आणखीनच दिसू येतात. अशावेळी चेहऱ्यावर तूप लावावे. सर्वच स्वयंपाक घरांमध्ये तूप असते. आरोग्यासंबंधित कोणतेही समस्या उद्भवल्यानंतर तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी तुपाचा वापर करावा. तसेच तुम्ही घरच्या घरीसुद्धा तूप बनवू शकता. तूप त्वचेमधील मॉईश्चर कायम टिकवून ठेवते.
सुरकुत्या कमी करण्यासाठी वाटीमध्ये तूप घेऊन त्यात दही मिक्स करून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर किंवा डोळ्यांभोवती आलेल्या सुरकुत्यांवर लावून काहीवेळा तशीच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून घ्या. मसाज केल्यामुळे डोळ्यांभोवती सैल झालेली त्वचा घट होईल आणि चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतील. तुपाचे मिश्रण तुम्ही डोळ्यांभोवती आणि संपूर्ण चेहऱ्यावर सुद्धा लावू शकता. त्वचेमहडिल ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी तूप आणि दही अतिशय प्रभावी आहे.
त्वचेचे पीएच संतुलित ठेवण्यासाठी दह्याचा वापर करावा. यामध्ये असलेले हेल्दी फॅट्स चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो देतात. दही आणि तुपाचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स, ब्लॅकहेड्स, व्हाईट हेड्सची समस्या कमी होऊन जाते. याशिवाय तांदळाच्या पिठात सुद्धा तूप मिक्स करून तुम्ही त्वचेवर लावू शकता. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा चेहऱ्यावर फेसपॅक किंवा फेसमास्क लावल्यास चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन कमी होण्यासोबतच त्वचा सुंदर आणि चमकदार दिसेल.