थंडीमध्ये त्वचा खूप जास्त ड्राय होते? मग 'या' डाळीचा वापर करून घरीच तयार करा सुगंधी उटणं
वर्षाच्या बाराही महिने संपूर्ण शरीर, त्वचा आणि केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक कोरडी आणि निस्ते होऊन जाते. चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स, मुरुमांचे डाग, काळे डाग, पिगमेंटेशन इत्यादी सर्वच त्वचेसंबंधित समस्या उद्भवतात. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे चेहऱ्यावर टॅनिंग वाढते आणि त्वचा अधिकच निस्तेज होऊन जाते. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेमधील ओलावा काहीसा कमी होऊन जातो. ज्यामुळे त्वचा कोरडी पडणे, त्वचा पांढरी दिसणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. चेहऱ्यावर वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअरचा वापर करतात. पण काहीवेळा स्किन केअरमध्ये वापरल्या जाणाऱ्या चुकीच्या प्रॉडक्टमुळे त्वचा पूर्णपणे खराब होऊन जातो.(फोटो सौजन्य – istock)
हिवाळ्यात चा कोरडी पडणे, खाज सुटणे, ओठ फाटणे आणि चेहऱ्यावर जळजळ होणे इत्यादी अतिशय सामान्य समस्या उद्भवतात. त्वचेमधील ओलावा कमी होऊन जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करून सुगंधी उटणं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दिवाळीच्या पहिल्या अभ्यंग स्नानाच्या दिवशी उटणं लावून अंघोळ केली जाते. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे उटणं मिळतात. पण घरगुती पदार्थांपासून बनवलेले उटणं चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यास मदत करते.
मुलतानी माती त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे. मागील अनेक वर्षांपासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मुलतानी मातीचा वापर केला जातो. यामुळे त्वचेवर तेल कमी होते. चेहऱ्यावर जमा होणाऱ्या अतिरिक्त तेलामुळे त्वचा अतिशय चिकट आणि तेलकट होऊन जाते, ज्यामुळे पिंपल्स येणे, मुरूम इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. चेहऱ्यावर साबण लावण्याऐवजी मुलतानी मती लावावी. मुलतानी मातीमध्ये गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा अधिकच सुंदर आणि चमकदार होईल. यामुळे चेहऱ्यावर वाढलेला कोरडेपणा कमी होतो.
चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स, ऍक्ने आणि त्वचेच्या इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मसूर डाळीचा वापर करावा. मसूर डाळ मिक्सरमधून बारीक करून घ्या. त्यानंतर त्यात कच्चे दूध टाकून पेस्ट तयार करा. तयार केलेली मसूर डाळीची पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या. तयार केलेले उटणं आठवडाभर नियमित लावल्यास चेहऱ्यावर ग्लो येईल.