Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवघरात पाण्याने भरलेला कलश आणि त्यावर नारळ का ठेवतात? जाणून घ्या धार्मिक आध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्त्व !

हिंदू धर्मात कलश आणि नारळाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. देवघरात पाण्याने भरलेला कलश आणि त्यावर ठेवलेला नारळ हे सुख, समृद्धी, पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. जाणून घ्या या परंपरेमागील धार्मिक, आध्यात्मिक आणि शास्त्रीय कारणे.

  • By Dilip Bane
Updated On: Jun 09, 2026 | 01:59 PM
Kalash with Coconut Significance

Kalash with Coconut Significance

Follow Us
Follow Us:

हिंदू धर्मात तुम्ही बघाल तर पूजा-अर्चा असो, कुठलेही शुभ कार्य असो, देवाची पूजा असो, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात सुद्धा तुम्हाला कलश आणि त्यावर नारळ असलेला तांब्या देवघरात नक्कीच दिसेल. खास करून गृहप्रवेश असेल किंवा धार्मिक विधी असतील, तेव्हा कलश महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे नारळ आणि कलश यांना धार्मिक विधींमध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून आपण त्यामागील शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारणे शोधूया!

कलशाचे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मग्रंथ वाचले असतील तर त्यात स्पष्ट म्हटले आहे की, कलशातील पाणी हे जीवन, समृद्धी आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. देव-देवतांना आवाहन करत असाल तर कलश आणि नारळ फार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, अशी एक पुरातन काळापासून धारणा आहे.

नारळ का ठेवला जातो?

नारळाला आपण श्रीफळ असेही म्हणतो. कोणाचा सत्कार करायचा असेल, देवाला गाऱ्हाणे घालायचे असेल किंवा कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर आपण नारळ ठेवतो. त्याचे कारण म्हणजे श्रीफळ हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. नारळावर जे तीन डोळे दिसतात, त्यांना भगवान शिवांच्या त्रिनेत्राचे प्रतीक मानले जाते. देवाला प्रसन्न करण्यासाठी कलशावर नारळ ठेवला जातो.

vastu tips: मुलांच्या खोलीतील रंगांसह या गोष्टींकडेही द्या लक्ष

पाण्याने भरलेल्या कलशामागील शास्त्र

जल हे आपल्या जीवनासाठी किती महत्त्वाचे आहे हे आपण सर्वच जाणतो. सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे हे पाण्याचे महत्त्वाचे कार्य आहे, असे वास्तुशास्त्रात म्हटले आहे. त्यामुळे कलशातील पाणी नकारात्मक ऊर्जा कमी करून स्थिरता प्रदान करते. तसेच जल मनाला शांतता प्रदान करते.

देवघरात कलश ठेवण्याचे फायदे

  • सुख-समृद्धीचे महत्त्वाचे वाहक आहे.
  • कुठल्याही शुभ कार्यात शुभत्व वाढते.
  • सकारात्मक ऊर्जा निर्माण करून नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत होते.
  • मनाची स्थिरता टिकवून ठेवते तसेच आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यास मदत करते.

कलश ठेवताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी

  • कलश स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे.
  • कलशातील पाणी वेळोवेळी बदलत राहावे.
  • नारळ खराब झाला असेल तर तो बदलून टाकावा.
  • देवघरात किंवा इतर पवित्र जागी कलशाची स्थापना करावी.
धार्मिक श्रद्धेचा विचार केला तर कलश आणि नारळ हे समृद्धी, शुभत्व आणि दैवी शक्तीचे प्रतीक मानले जाते, अशी पूर्वीपासूनची धारणा आहे. त्यामुळे हिंदू घरांमध्ये तुम्हाला नेहमीच पाण्याने भरलेला कलश व त्यावर नारळ ठेवण्याची परंपरा आजही आवर्जून दिसून येते.

महाशिवरात्रीच्या दिवशी करा रामायणाचे पठण, होतील घरातील वास्तूदोष दूर

Web Title: Kalash significance what does a water filled kalash with coconut symbolize in hinduism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • hindu religion
  • spiritual
  • Vastushastra

संबंधित बातम्या

Kneaded Dough Finger Marks: कणीक भिजवल्यावर बोटांचे छाप का सोडले जातात? पितर आणि सुखसमृद्धीशी जोडली मान्यता
1

Kneaded Dough Finger Marks: कणीक भिजवल्यावर बोटांचे छाप का सोडले जातात? पितर आणि सुखसमृद्धीशी जोडली मान्यता

Ganeshotsav 2026: गणपतीच्या चरणी दुर्वा वाहता? मग ‘हे’ 5 नियम नक्की जाणून घ्या!
2

Ganeshotsav 2026: गणपतीच्या चरणी दुर्वा वाहता? मग ‘हे’ 5 नियम नक्की जाणून घ्या!

Rishi Panchami Vrat Katha: ऋषीपंचमीला नक्की वाचा पौराणिक कथा, मासिक पाळीशी संबंध काय
3

Rishi Panchami Vrat Katha: ऋषीपंचमीला नक्की वाचा पौराणिक कथा, मासिक पाळीशी संबंध काय

Vastu Tips for Wallet: पाकीट रिकामं होण्यामागे ‘या’ ५ वस्तू कारणीभूत? वास्तुशास्त्र काय सांगतं जाणून घ्या…
4

Vastu Tips for Wallet: पाकीट रिकामं होण्यामागे ‘या’ ५ वस्तू कारणीभूत? वास्तुशास्त्र काय सांगतं जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.