जेवणानंतर नियमित चावून खा 'हा' हिरवा पदार्थ; तोंडाच्या दुर्गंधीपासून मिळेल सुटका
किचनमध्ये वापरली जाणारी छोटी वेलची केवळ पदार्थांची चव वाढवणारा मसाला नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदात वेलचीला औषधी गुणांनी परिपूर्ण मानले जाते. विशेष म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाल्ल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल घडतात.वेलचीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सडेंट्स असतात. त्यामुळे झोपेची खराब झालेली गुणवत्ता सुधारते. बऱ्याचदा रात्रीच्या वेळी शांत आणि आरामदायी झोप लागत नाही. अपुऱ्या झोपेमुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. सतत ऍसिडिटी, अपचन आणि पित्ताची समस्या उद्भवते. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी वेलची दाण्यांचे सेवन करावे. वेलचीचे दाणे संपूर्ण शरीर सुधारण्यासाठी मदत करतात. याशिवाय गोड पदार्थ बनवताना वेलचीचा आवर्जून वापर केला जातो. (फोटो सौजन्य – istock)
रात्री वेलची खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. गॅस, अपचन आणि पोट फुगण्यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच सकाळी पोट साफ होण्यास मदत होते.वेलचीमध्ये नैसर्गिक शांत करणारे घटक असतात, जे मानसिक तणाव कमी करतात. त्यामुळे झोप खोल आणि शांत लागते.तिखट, तेलकट आणि अतिमसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया कमकुवत होऊन जाते. पचनक्रिया सुधारण्यासाठी वेलची दाण्यांचे सेवन करावे.
अन्नपदार्थांचे सेवन केल्यानंतर बऱ्याचदा अन्नाचे कण तोंदातव तसेच साचून राहतात. हे कण दीर्घकाळ दातांमध्ये राहिल्यामुळे कुजतात आणि तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. वेलची तोंडातील दुर्गंधी कमी करते आणि तोंडातील जंतू नष्ट करते. त्यामुळे सकाळी झोपेतून उठल्यानंतर फ्रेश वाटते.जेवणानंतर वेलचीचे दाणे तोंडात चघळत राहिल्यास तोंडाच्या दुर्गंधीपासून कायमची सुटका मिळेल.
मधुमेह असलेल्या लोकांसाठी वेलची फायदेशीर ठरू शकते. तीरक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते.वेलची मेटाबॉलिज्म वाढवते, ज्यामुळे शरीरातील चरबी जळण्याची प्रक्रिया वेगवान होते आणि वजन कमी होण्यास मदत मिळते.वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. पण हानिकारक सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी नियमित जेवणानंतर एक वेलची चघळावी. यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल आणि शरीराला सुद्धा फायदे होतील.
Ans: गॅस, ॲसिडिटी आणि अपचन कमी करते.श्वासाची दुर्गंधी दूर करते आणि तोंडाचे संक्रमण टाळते.
Ans: चहामध्ये वेलची टाकून पिऊ शकता.
Ans: रोजच्या आहारात थोड्या प्रमाणात सेवन करू शकता. जेवणामध्ये किंवा चहामध्ये, तसेच सकाळी रिकाम्या पोटी वेलदोड्याचे पाणी पिणे फायदेशीर मानले जाते.






