
वयाच्या पन्नशीत चेहऱ्यावर टिकून राहील तारुण्य! स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा वापर करून घरीच बनवा फेस सीरम
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव, कमी पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरसोबतच त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे त्वचेची काळजी घेणे फार आवश्यक आहे. वय वाढल्यानंतर त्वचेवर मोठ्या प्रमाणात डार्क सर्कल्स, पिंपल्स, पिगमेंटशन वाढून त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते. वाढत्या वयात त्वचेची लवचिकता वाढवण्यासाठी महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. कधी फेस सीरम लावले जातात तर कधी वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची गुणवत्ता सुधारली जाते. त्वचा सैल पडल्यानंतर मेकअप केल्यानंतर सुद्धा त्वचा अजिबात चांगली दिसत नाही.(फोटो सौजन्य – istock)
तरुण वयात त्वचेसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर महिला खूप जास्त चिंता व्यक्त करतात. यामुळे हार्मोन्सवर परिणाम होतो. हार्मोन्सचे असंतुलन वाढल्यानंतर चेहऱ्यावर मोठे मोठे फोड येऊन त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील तारुण्य कायम टिकवून ठेवण्यासाठी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून फेस सीरम बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले फेस सीरम रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज केल्यास आठवडाभरात फरक दिसून येईल. हे सीरम लावल्यामुळे त्वचेचा रंग उजळदार होण्यास मदत होईल.
लवंग
पाणी
कॉफी पावडर
फेस सीरम बनवण्यासाठी सर्वप्रथम, तवा गरम करून त्यावर ८ ते १० लवंग मंद आचेवर भाजा. भाजलेली लवंग थंड झाल्यानंतर खलबत्यामध्ये घालून बारीक कुटून घ्या. टोपात एक ग्लास पाणी उकळवण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात कुटून घेतलेली लवंग आणि एक कॉफी घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून थंड करण्यासाठी ठेवा. अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असलेली लवंग त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. चेहऱ्यावर आलेले मुरूम आणि पिंपल्स कमी करण्यासाठी नियमित सीरमचा वापर करा.
Fine Lines: कमी वयातच चेहऱ्यावर दिसताहेत सुरकुत्या? जाणून घ्या त्यामागची खरी कारणे
तयार केलेले सीरम काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा. रात्री झोपण्याआधी नियमित चेहऱ्यावर लावून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवा. याशिवाय तयार केलेल्या सीरममध्ये साखर, बेसन, मुलतानी माती घालून फेसपॅक सुद्धा बनवून लावू शकता. लवंगमध्ये असणारे अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेवरील पिंपल्स आणि बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात. तर कॉफीच्या वापरामुळे त्वचेवरील डेड स्किन नष्ट होते.