(फोटो सौजन्य: istock)
सावधान! डायबिटीज आणि वजन कमी करण्याच्या औषधांमुळे होऊ शकते केसगळती? रिसर्चमध्ये मोठा खुलासा
ब्रेन डेवलपमेंटसाठी आहारात ३ सूपरफूड्सचा समावेश करा
पीडियाट्रिशियन डाॅक्टरांनी सांगितले की, सुरुवातीच्या काळातील १००० दिवसांमध्ये मेंदूची वाढ फार वेगाने होत असते. यामुळे याकाळात तुम्ही मुलांना जे काही खायला द्याल त्याचा ब्रेन सेल्सवर मोठा परिणाम होत असतो. याचा मुलांची मेमरी, लर्निंग आणि डेव्हलपमेंटमध्ये सुधार आणण्यास मदत होते. तुम्हालाही जर सुरुवातीच्या काळापासून मुलांमध्ये डेवलपमेंट झालेली पाहायची असेल तर तीन खास रेसिपीज तुम्ही त्यांना नक्की खाऊ घालायला हव्यात.
अक्रोडची प्यूरी
या लिस्टमध्ये सर्वात पहिली रेसिपी आहे ती म्हणजे अक्रोडची प्यूरी. अक्रोड हे वनस्पतीजन्य ओमेगा-३ फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहेत. यासाठी अक्रोड्सना हलकं भाजून याची एक पावडर तयार करा. यानंतर तयार पावडर दूध, दही, दलिया किंवा फ्रूट प्यूरीमध्ये मिक्स करुन मुलांना खाऊ घाला.
अंड देखील आहे चांगला पर्याय
पीडियाट्रिशियननुसार अंड्याचे सेवन देखील मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी मदतनीस ठरु शकते. अंड्यात भरपूर प्रमाणात कोलीन असते जे मुलांमध्ये ब्रेन डेवलपमेंट आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी महत्त्वाचे काम करते. मुलांना पूर्णपणे शिजवलेलं आणि मॅश केलेलं अंड खायला घाला.
चेहऱ्यावरील तेज नाहीसे झाले आहे? चेहरा स्वच्छ करण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचा वापर, टॅनिंग होईल नष्ट
राजगिरा खाऊ घाला
यातील शेवटचा पर्याय म्हणजे राजगिरा. यात प्रोटीन, आर्यन आणि मॅग्नेशियमचे चांगले प्रमाण आढळते. हे मुलांच्या वाढीस आणि ओवरऑल डेवलपमेंटमध्ये चांगली मदत करतात. राजगिऱ्याला चांगल्या प्रकारे नरम होईपर्यंत शिजवा आणि मॅश केलेल्या भाज्यांसोबत मिक्स करुन ते मुलांना खाऊ घाला. चव आणि पोषण ॲड करण्यासाठी तुम्ही यात सफरचंदाची प्यूरी देखील मिक्स करु शकता.





