
१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चमचमीत अचारी पराठा
सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाऊन कंटाळा येतो. नाश्त्यात चहा चपाती, पराठा, कांदापोहे किंवा उपमा शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. नेहमीच बटाटा किंवा भाज्या घालून बनवलेले पराठा खाण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही १० मिनिटांमध्ये झटपट आचारी पराठा बनवू शकता. चटपटीत लोणच्यांचा वापर करून बनवलेला पराठा आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. सकाळच्या नाश्त्यात नेहमी पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. मात्र आपल्यातील अनेक लोक वजन वाढेल म्हणून सकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण असे केल्यामुळे शरीराला धोकादायक आजाराची लागण होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कुणाल कपूर यांनी सांगितलेली आचारी पराठ्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पराठा तुम्ही कोणत्याही चटणी किंवा सॉस सोबत खाऊ शकता.(फोटो सौजन्य – pinterest)
दुपारच्या जेवणात कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा तिळकूट गवार, तांदळाच्या भाकरीसोबत लागेल झणझणीत