Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांपासून बनवा टेस्टी कुरकुरीत रोटी कटलेट; चव लागेल भारी! नोट करून घ्या रेसिपी

Roti Cutlet Recipe: जर तुम्हालाही उरलेल्या पोळ्या फेकायच्या नसतील तर ही रोटी कटलेट रेसिपी नक्की ट्राय करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 12, 2026 | 08:31 PM
Photo- Ai genereted

Photo- Ai genereted

Follow Us
Follow Us:
  • नाश्त्यासाठी आहे एकदम भन्नाट पर्याय
  • उरलेल्या पोळ्यांचे बनवा चविष्ट रोटी कटलेट
  • नोट करून घ्या रेसिपी
रोजच्या जेवणात पोळ्या बनवल्यानंतर काही पोळ्या उरतातच. ही जवळपास प्रत्येक घरातली गोष्ट आहे. दुसऱ्या दिवशी त्या पोळ्या खाण्याचा कंटाळा येतो आणि अनेकदा त्या फेकून देण्याची वेळही येते. मात्र, या उरलेल्या पोळ्यांचा उपयोग करून तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी चविष्ट आणि कुरकुरीत रोटी कटलेट बनवू शकता. विशेष म्हणजे यासाठी वेगळ्या किंवा महागड्या साहित्याची गरज नाही. घरात उपलब्ध असलेल्या भाज्या, मसाले आणि इतर पदार्थांचा वापर करून हे कटलेट सहज बनवता येतात.ही रेसिपी बनवायला सोपी असून घरातील उपलब्ध भाज्यांचा वापर करूनही ती तयार करता येते. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही रोटी कटलेट रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात मोदकांवर ताव मारताय? वेळीच सावध व्हा, अन्यथा…; आहारतज्ज्ञांनी दिला सल्ला

रोटी कटलेटसाठी साहित्य

  • ४ ते ५ उरलेल्या पोळ्या
  • २ उकडलेले बटाटे
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • ½ कप बारीक चिरलेली गाजर किंवा इतर भाज्या
  • १ ते २ हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • ½ चमचा लाल तिखट
  • ½ चमचा जिरेपूड
  • ½ चमचा चाट मसाला
  • मीठ
  • ब्रेड क्रम्ब्स किंवा रवा
  • तेल

अशी बनवा रोटी कटलेट

सर्वप्रथम उरलेल्या पोळ्यांचे छोटे तुकडे करून घ्या. हे तुकडे मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्या. आता एका मोठ्या भांड्यात हे पोळीचे मिश्रण काढा. त्यामध्ये उकडलेले बटाटे चांगले मॅश करून घाला.यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, गाजर किंवा उपलब्ध भाज्या, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला. लाल तिखट, जिरेपूड, चाट मसाला आणि मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा.मिश्रण पातळ वाटत असल्यास त्यात थोडे ब्रेड क्रम्ब्स किंवा रवा घालू शकता. आता हाताला थोडे तेल लावून मिश्रणाचे छोटे गोळे तयार करा आणि हलक्या हाताने कटलेटचा आकार द्या. यानंतर, तवा गरम करून त्यावर थोडे तेल सोडा. तयार केलेली कटलेट्स तव्यावर ठेवून दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करा. तयार रोटी कटलेट्स गरमागरम चटणी, टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.

छोट्या टिप्स

कटलेट अधिक कुरकुरीत हवे असल्यास बाहेरून रवा किंवा ब्रेड क्रम्ब्सचा हलका थर लावा. तसेच भाज्यांमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे मटार, बीट किंवा कोबीचा समावेश करू शकता.

५ वर्षांपासून कानात येणाऱ्या ‘हृदयाच्या ठोक्यांसारख्या’ आवाजापासून मुक्ती; जसलोक हॉस्पिटलमध्ये २५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार

Web Title: Leftover roti cutlet recipe crispy breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 08:31 PM

Topics:  

  • best recipe
  • Chapati
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Diwali 2026: दिवाळी स्पेशल रेसिपी! कोकणातील पारंपरिक पद्धतीने वाटीभर तांदळाच्या पिठापासून बनवा चविष्ट बोरं
1

Diwali 2026: दिवाळी स्पेशल रेसिपी! कोकणातील पारंपरिक पद्धतीने वाटीभर तांदळाच्या पिठापासून बनवा चविष्ट बोरं

Banana Sheera: पिकलेली खायला अजिबात आवडत नाही, मग ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा केळीचा मऊ स्वादिष्ट शिरा, नोट करा रेसिपी
2

Banana Sheera: पिकलेली खायला अजिबात आवडत नाही, मग ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा केळीचा मऊ स्वादिष्ट शिरा, नोट करा रेसिपी

Diwali 2026: मैद्याचा वापर न करता वाटीभर गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवा खमंग खुसखुशीत शंकरपाळ्या, नोट करा रेसिपी
3

Diwali 2026: मैद्याचा वापर न करता वाटीभर गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवा खमंग खुसखुशीत शंकरपाळ्या, नोट करा रेसिपी

Diwali 2026: नानकटाई बनवल्यानंतर दगडासारखी कडक होऊन जाते? मग या पद्धतीने घरी बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई
4

Diwali 2026: नानकटाई बनवल्यानंतर दगडासारखी कडक होऊन जाते? मग या पद्धतीने घरी बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.