ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! 'या' पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम
Lip Care: चेहऱ्यासोबतच ओठांची सुद्धा खूप जास्त काळजी घेतली जाते. ओठ नॅचरली गुलाबी आणि हायड्रेट दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आणि चुकीची जीवनशैली फॉलो केल्यामुळे ओठांचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. ओठ कोरडे झाल्यानंतर ते चमकदार करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टचा वापर केला जातो तर काहीवेळा ओठांची काळजी घेताना ट्रीटमेंट सुद्धा करून घेतल्या जातात. पण ओठासंबंधित केलेल्या ट्रीटमेंटमुळे ओठ फक्त काही काळापुरतेच सुंदर दिसतात आणि पुन्हा एकदा कोरडे होऊन त्वचा रखरखीत दिसते. त्यामुळे महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी या पदार्थांचा वापर करून घरीच लिपबाम तयार करावा. चला तर जाणून घेऊया लिपबाम बनवण्याची सोपी पद्धत.(फोटो सौजन्य – istock)
रोज रात्री झोपण्याआधी ओठांवर लिपबाम लावावे. यामुळे ओठ हायड्रेट राहण्यास मदत होतील. तयार केलेले लिपबाम तुम्ही लिपस्टिक लावण्याच्या आधी सुद्धा लावू शकता. यामुळे ओठांना खोलवर पोषण मिळेल आणि ओठ चमकदार दिसण्यास मदत होईल. कोरडे झालेले ओठ किंवा त्वचेसंबंधित इतर समस्या वाढू लागल्यानंतर कायमच महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. यामुळे ओठांचे सौंदर्य अधिक काळ व्यवस्थित टिकून राहते आणि समस्या कमी होतात.
कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist
वारंवार लिपस्टिक किंवा बाजारातील लिपबाम लावून काळे आणि कोरडे ओठ त्वचेचे सौंदर्य खराब करून टाकतात. त्यामुळे महागड्या कॉस्मेटिक उत्पादनांवर पैसे वाया घालवण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर केल्यास ओठांचे सौंदर्य अधिक खुलून दिसेल. होममेड लिपबाम ओठ नॅचरली स्मूथ ठेवण्यास मदत करतात. बीटच्या रसात असलेले गुणकारी घटक ओठांवरील गुलाबीपणा वाढवतात.






