Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील एक सरोवर जिथे पाण्यात तरंगणारे बेट बदलतात आपली जागा, हा आहे जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क

Floating National Park : भारतातील अद्भूत नैसर्गिक ठिकाण जे दरवर्षी हजारो पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते. तुम्हाला माहिती आहे का भारताच्या ईशान्य भागात एक असे सरोवर वसले आहे ज्यावरील बेट पाण्यातच आपली स्थिती बदलत राहतात. इथे पाण्यावरच तरंगणारे जगातील एकमेव नॅशनल पार्क देखील आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 07, 2026 | 08:01 AM
भारतातील एक सरोवर जिथे पाण्यात तरंगणारे बेट बदलतात आपली जागा, हा आहे जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क

भारतातील एक सरोवर जिथे पाण्यात तरंगणारे बेट बदलतात आपली जागा, हा आहे जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क

Follow Us
Follow Us:
  • या ठिकाणाची रचना जगातील इतर सरोवरांपेक्षा पूर्णपणे वेगळी मानली जाते.
  • येथे निसर्ग, वन्यजीव आणि जैवविविधतेचा अनोखा संगम पाहायला मिळतो.
  • दरवर्षी हजारो पर्यटक आणि निसर्गप्रेमी खास अनुभवासाठी येथे भेट देतात.
तुम्हाला माहिती आहे का? भारतात एक असे सरोवर आहे ज्याच्या पाण्यात काही बेट तरंगत असतात. मुख्य म्हणजे पाण्यातच ते आपली स्थिती देखील बदलतात. हे असे वैशिष्ट्यपूर्ण सरोवर जगभरात एकमेव असून ते भारतातील मणिपूर राज्यात वसले आहे. या सरोवराला लोकतक या नावाने संबोधले जाते आणि ते देशातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. आता तुम्ही विचार कराल की बेट हे पाण्यात आपली स्थिती कसे काय बदलत असतात? आम्ही तुम्हाला सांगतो की, सरोवराची सर्वात मोठी खासियतच ही आहे की, इथल्या बेटांची फिक्स जागा नसते. चला या सरोवराविषयी काही सविस्तर जाणून घेऊया.

अनोळखी लोकांसोबत फिरण्याचा नवा ट्रेंड, जाणून घ्या पर्यटकांना का आवडत आहे Community Travel

पाण्यात तरंगणारे बेट

लोकतक सरोवरात तरंगणाऱ्या या बेटांना फुमदी असे म्हटले जाते. हे माती, जलवनस्पती आणि इतर सेंद्रिय पदार्थांचे घट्ट तुकडे असून ते पाण्यावर तरंगत राहतात. ऐकायला हे बेट फार कमकुवत असतात पण वास्तवात असं नाहीये. हे बेट इतके मजबूत असतात की अनेक मच्छीमार त्यांच्यावर आपल्या झोपड्या देखील बांधतात. सरोवरात पसरलेले हे मोठ्या आकाराचे फुमदी पर्यटकांना खास करुन आकर्षित करतात. अनेक लोक दूरदूरवरुन यांना भेट द्यायला इथे येतात आणि सुंदर फोटो/व्हिडिओ देखील शूट करतात.

जगातील एकमेव तरंगणारे नॅशनल पार्क

या सरोवराची आणखी एक खासियत म्हणजे इथे जगातील एकमेव असे नॅशनल पार्क आहे जे पाण्यात तरंगते. लोकतक सरोवराच्या आग्नेय भागात केबुल लामजाओ नॅशनल पार्क वसले आहे. हे पार्क सुमारे ४० चाैरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले असून एका मोठ्या फुमदीवर त्याला बांधण्यात आले आहे. हे उद्यान लुप्तप्राय संगाई हरणांचे निवासस्थान मानले जाते. या हरणांना डान्सिंग डियर या नावानेही ओळखले जाते कारण ते जेव्हा पाण्यात तरंगणाऱ्या फुमदीवरुन उड्या मारतात तेव्हा असं वाटतं जणू ते डान्स करत आहेत. याबरोबरच तुम्हाला इथे पाणमांजर, काही जलचर पक्षी आणि विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी देखील पाहायला मिळतील .

पावसाळ्यात ऑफ-रोडींग साठी पुणे-मुंबई जवळील ही आहेत ५ बेस्ट ठिकाणे! एका क्लिकवर पाहून घ्या

पर्यटकांची गर्दी

लोकतक सरोवर आपल्या बायोडाइवर्सिटीसाठी ओळखले जाते. या सरोवरात अनेक प्रकारचे वनस्पती आणि देश-विदेशातील पक्षी पाहायला मिळतात. हिवाळ्याच्या सीजनमध्ये तर इथे अनेक स्थलांतरीत पक्षी देखील पाहयाला मिळतात. अनेक बर्ड वाॅचर्स त्यांचे साैंदर्य पाहण्यासाठी या काळात सरोवराला भेट देतात. इथल्या ‘फ्लोटींग होम स्टे’मध्ये राहून तुम्ही एक वेगळा अनुभव घेऊ शकता.

 

Web Title: Loktak lake manipur floating islands and worlds only floating national park

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 08:01 AM

Topics:  

  • Manipur
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

बाजूला सारा गोवा, यंदा भेट द्या रत्नागिरीला भेट… बीच, किल्ले ते रानमेव्यापर्यंत इथे मिळेल अनेक गोष्टींचा अनुभव
1

बाजूला सारा गोवा, यंदा भेट द्या रत्नागिरीला भेट… बीच, किल्ले ते रानमेव्यापर्यंत इथे मिळेल अनेक गोष्टींचा अनुभव

Tourism: कोकणच्या पर्यटनाला मिळणार नवी झेप! ‘सिंधुरत्न 2.0’ मधून रत्नागिरी-सिंधुदुर्गचा विकास
2

Tourism: कोकणच्या पर्यटनाला मिळणार नवी झेप! ‘सिंधुरत्न 2.0’ मधून रत्नागिरी-सिंधुदुर्गचा विकास

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी
3

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी
4

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.