
kokan tourism
विशेषतः पर्यटन क्षेत्राच्या विकासाला या योजनेत अधिक प्राधान्य देण्याची गरज व्यक्त होत आहे. सिंधुरत्न योजनेच्या जिल्ह्यातील माध्यमातून पर्यटनवाढीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. ब्लू फ्लॅग नामांकन मिळालेल्या किनाऱ्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास तसेच कॅरेव्हॅन पर्यटनाची संकल्पना यामुळे कोकणातील पर्यटनाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. या उपक्रमांची व्याप्ती वाढवून अधिकाधिक पर्यटनस्थळांचा विकास करण्याची गरज आहे.
गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांचे सादरीकरण, फळबाग व शेती पर्यटन, साहसी व क्रीडा पर्यटन, समुद्रातील जलक्रीडा, स्कुबा डायव्हिंग, पॅराग्लायडिंग यांसारख्या संकल्पनांना चालना दिल्यास पर्यटकांचा मुक्काम वाढविण्यास मदत होऊ शकते. यामुळे स्थानिक हॉटेल व्यवसाय, वाहतूक, लघुउद्योग, महिला बचत गट आणि स्थानिक उत्पादकांनाही आर्थिक फायदा मिळू शकतो.
पर्यटन क्षेत्रात मोठे अर्थकारण दडलेले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांची नैसर्गिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक बलस्थाने लक्षात घेता पर्यटन विकासाची मोठी क्षमता येथे आहे. सिंधुरत्नसारख्या प्रभावी योजनांच्या माध्यमातून या क्षमतेला दिशा देतानाच दीर्घकालीन नियोजन, आवश्यक पायाभूत सुविधा आणि स्वतंत्र पर्यटन धोरण यांचा समन्वय साधल्यास कोकणच्या पर्यटनात्ला व्यापक व्यासपीठ मिळू शकते.
कोकणातील पर्यटन क्षेत्राच्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करण्यासाठी स्वतंत्र विशेष पर्यटन धोरणावी आवश्यकता आहे. केरक्त आणि गोया या राज्यांनी पर्यटनाला स्वतंत्र धोरणात्मक प्राधान्य देत स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. त्याच धर्तीवर कोकणासाठी स्थानिक गरजा आणि वैशिष्ट्ये लक्षात घेऊन पर्यटन धोरण आखल्यास रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात.
Jaitapur: जैतापूर अजूनही रखडलेलाच, त्यात रत्नागिरीत ४ नवे अणुप्रकल्प! नागरिकांचा संतापाचा उद्रेक
कोकणातील भात मासे यांसारख्या पारंपरिक खाद्य संस्कृतीला प्रोत्साहन देतानाच हापूस आंबा आगि काजू यांचे राष्ट्रीय व जागतिक पातळीवर प्रभावी इंडिंग करता येऊ शकते. आआंबा, काजू आणि स्थानिक खाद्यपदार्थांचे महोत्सव आयोजित करून पर्यटकांना कोकणी संस्कृतीशी जोडता येईल, स्थानिक लोककला, पारंपरिक व्यवसाय आणि सांस्कृतिक वारशालाही प्रोत्साहन देण्याची गरज आहे.