(फोटो सौजन्य-AI एआय)
काय आहे ‘टू सनफ्लावर थिअरी’?
या थिअरीचा मुख्य विचार असा आहे की, आपल्या आवडत्या व्यक्तीला 2 सूर्यफुलं भेट द्यावीत. एक फूल समोरच्या व्यक्तीसाठी, तर दुसरं फूल आपल्या नात्याचं प्रतीक म्हणून पाहता येतं. जेव्हा दिवसा प्रकाशाची वेळअसते तेव्हा सूर्यफुले सूर्यासमोर तोंड करून उभी असतात. जे जोडप्याच्या किंवा मित्रांच्या चांगल्या साथीच्या भावनेचे प्रतिक आहे. तर जेव्हा रात्र होते तेव्हा सूर्य नसतो, आणि अंधारातही सूर्यफुले एकमेकांकडे तोंड करून उभी असतात. जे अंधाराच्या वेळीही, अडचणीच्या वेळी एकमेकांच्या साथीचे आणि धैर्याचे प्रतिक म्हणून दर्शवतात. काही जण याचा अर्थ दोन व्यक्तींचं एकमेकांच्या आयुष्यात असलेलं महत्त्व, एकमेकांना दिलेली साथ आणि एकत्र आनंदी राहण्याची इच्छा असा लावतात.
सूर्यफूलच का ठरतं खास?
सूर्यफूल हे आनंद, सकारात्मकता, आशा आणि आपुलकीचं प्रतीक मानलं जातं. सूर्याच्या दिशेने वळणाऱ्या या फुलामुळे आशावादी राहण्याची आणि आयुष्यात प्रकाश शोधण्याची कल्पनाही जोडली जाते. त्यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तीला सूर्यफुलं देणं म्हणजे तिच्या आयुष्यात आनंद आणण्याची आणि तिच्या पाठीशी उभं राहण्याची भावना व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग ठरू शकतो.
प्रेमापुरताच मर्यादित नाही हा ट्रेंड!
‘टू सनफ्लावर थिअरी’ फक्त प्रेमीयुगुलांसाठीच नाही. आपल्या खास मित्राला, मैत्रिणीला किंवा कठीण काळात साथ देणाऱ्या व्यक्तीलाही 2 सूर्यफुलं देता येतात. एखाद्या छोट्या भेटीतून ‘तू माझ्यासाठी महत्त्वाची व्यक्ती आहेस’ हा संदेश पोहोचवता येतो. वाढदिवस, मैत्रीदिन, व्हॅलेंटाईन डे किंवा कोणताही खास दिवस यासाठी ही कल्पना वापरता येईल.
या ट्रेंडची खरी गंमत महागड्या भेटवस्तूमध्ये नसून, त्यामागच्या भावनेत आहे. तुम्ही 2 सूर्यफुलं देताना त्यासोबत एक छोटी चिठ्ठी लिहू शकता किंवा तुमच्या नात्यातील एखादी खास आठवण सांगू शकता. सोशल मीडियावरील ट्रेंड म्हणून सुरू झालेली ही कल्पना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एक निमित्त ठरू शकते. शेवटी, नातं खास बनवण्यासाठी फुलांची संख्या नाही, तर ती देताना मनात असलेली आपुलकी महत्त्वाची असते.
उधार घेतलेले पैसे परत करायला लोक टाळाटाळ का करतात? जाणून घ्या यामागचं मानसशास्त्र
प्रश्न 1: टू सनफ्लावर थिअरी म्हणजे काय?
उत्तर: ही सोशल मीडियावर चर्चेत असलेली एक कल्पना आहे. आपल्या प्रिय व्यक्तीला किंवा जवळच्या मित्रमैत्रिणीला 2 सूर्यफुलं भेट देऊन प्रेम, मैत्री आणि आपुलकी व्यक्त करता येते.
प्रश्न 2: गर्लफ्रेंडला 2 सूर्यफुलं देण्यामागचा अर्थ काय आहे?
उत्तर: या कल्पनेनुसार 2 सूर्यफुलं दोन व्यक्तींमधील नातं, एकमेकांच्या आयुष्यातील महत्त्व आणि परस्पर साथ यांचं प्रतीक मानता येतात. पण या थिअरीचा एकच अधिकृत अर्थ नाही; भेटीचा अर्थ व्यक्ती स्वतःच्या भावना आणि नात्यानुसार ठरवू शकते.
प्रश्न 3: टू सनफ्लावर थिअरी फक्त प्रेमीयुगुलांसाठी आहे का?
उत्तर: नाही. ही कल्पना जवळच्या मित्रमैत्रिणींसाठी किंवा आपल्याला साथ देणाऱ्या खास व्यक्तीसाठीही वापरता येते. 2 सूर्यफुलांसोबत छोटी चिठ्ठी किंवा खास संदेश दिल्यास भेट आणखी अर्थपूर्ण होऊ शकते.






