Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वृंदावनमध्ये कमी खर्चात राहण्याचे ठिकाण शोधत आहात? या ठिकाणी मिळेल फक्त 225 रुपयांत एसी रूम, 65 रुपयांत जेवण

वृंदावनला जात आहात? बांके बिहारी मंदिराजवळील TFC केंद्रात फक्त 225 रुपयांत एसी रूम आणि 65 रुपयांत स्वादिष्ट भोजनाची सोय आहे. ऑनलाइन-ऑफलाइन बुकिंगसह कुटुंबासाठी उत्तम पर्याय.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 20, 2025 | 08:30 AM
वृंदावनमध्ये कमी खर्चात राहण्याचे ठिकाण शोधत आहात? या ठिकाणी मिळेल फक्त 225 रुपयांत एसी रूम, 65 रुपयांत जेवण

वृंदावनमध्ये कमी खर्चात राहण्याचे ठिकाण शोधत आहात? या ठिकाणी मिळेल फक्त 225 रुपयांत एसी रूम, 65 रुपयांत जेवण

Follow Us
Close
Follow Us:

जर तुम्ही जगप्रसिद्ध बांके बिहारी मंदिराच्या दर्शनासाठी वृंदावनला जाण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. बांके बिहारीची नगरी वृंदावनमध्ये अशी एक खास जागा आहे, जिथे कमी खर्चात आरामदायी निवास व स्वादिष्ट भोजनाची सुविधा मिळते. येथे ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारच्या बुकिंगची सोय असल्याने यात्रेचा अनुभव अधिक सोयीस्कर होतो. हे ठिकाण बांके बिहारी मंदिर आणि प्रेमानंद महाराज आश्रमापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर आहे.

उत्तराखंडातील चमत्कारिक धबधबा ज्याच्या पाण्यात दडलेत औषधी गुणधर्म; आंघोळ करताच दूर होतात सर्व रोग

कुठे आहे ही सुविधा?

उत्तर प्रदेशातील वृंदावनमध्ये टुरिस्ट फॅसिलिटी सेंटर (TFC) नावाचे केंद्र उभारले गेले आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांना येथे स्वस्तात थांबता येते आणि चांगल्या जेवणाचाही आस्वाद घेता येतो. ज्यांचा प्रवास मर्यादित बजेटमध्ये होतो त्यांच्यासाठी हे केंद्र एक उत्तम पर्याय आहे.

सुलभ दरातील निवास व्यवस्था

  • हे केंद्र सुमारे ९ कोटी रुपयांच्या खर्चाने बांधले गेले आहे आणि ते केंद्र सरकारच्या ‘प्रसाद योजना’ अंतर्गत चालवले जाते.
  • येथे फक्त 225 रुपयांत एसी बेडरूम मिळतो.
  • कमी खर्च करू इच्छिणाऱ्यांसाठी 60 रुपयांत फोल्डिंग गादीचीही सोय आहे.
  • 10-15 लोकांचा ग्रुप असेल, तरी सर्वांसाठी एकत्रित निवासाची व्यवस्था केली जाते.
  • भोजनासाठी फक्त 65 रुपयांत स्वादिष्ट व भरपेट जेवण दिले जाते.
  • तसेच पार्किंगचीही सोय आहे. हे केंद्र पागल बाबा मंदिराजवळ आणि 100 सैया हॉस्पिटलच्या समोर स्थित आहे.

श्रद्धाळूंसाठी मोठी सोय

दरवर्षी लाखो लोक वृंदावनला दर्शनासाठी येतात, ज्यांच्याकडे फारसे आर्थिक साधन नसते. त्यांच्यासाठी TFC केंद्र म्हणजे आशीर्वादासारखीच व्यवस्था आहे. इथे असा विचार करून सुविधा दिल्या आहेत की कोणताही यात्रेकरू उपाशी राहू नये. स्वस्त आणि आरामदायी ठिकाण देऊन TFC ने भाविकांसाठी प्रवास अधिक किफायतशीर केला आहे.

भारतातील असे काही अद्भुत बीच जिथे अनुभवता येतो अविस्मरणीय अनुभव; चांदण्याप्रमाणे चमकत इथल पाणी

वृंदावनला कसे पोहोचाल?

हवाईमार्ग: जवळचे विमानतळ दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ असून ते सुमारे 150 किमी अंतरावर आहे. तिथून बस, ट्रेन किंवा टॅक्सीने वृंदावन गाठता येते.

रेल्वेमार्ग: वृंदावनचा स्वतःचा छोटा स्टेशन आहे. मात्र प्रमुख रेल्वे स्थानक मथुरा जंक्शन आहे, जे साधारण 12 किमीवर आहे. मथुराहून ऑटो, बस किंवा टॅक्सीने वृंदावन सहज गाठता येते.

सडकमार्ग: दिल्ली, आग्रा, मथुरा व जयपूर यांसारख्या शहरांतून वृंदावनला थेट बस व टॅक्सी सेवा उपलब्ध आहे. दिल्लीहून यमुना एक्सप्रेसवे किंवा राष्ट्रीय महामार्ग-2 वापरून 3-4 तासांत प्रवास होतो.

त्यामुळे, जर तुम्ही कुटुंबासह वृंदावनला भेट देण्याचा विचार करत असाल, तर या टुरिस्ट फॅसिलिटी सेंटरमध्ये राहून तुम्ही कमी खर्चात सुखद प्रवासाचा अनुभव घेऊ शकता.

FAQs (संबंधित प्रश्न)

वृंदावन कुठे आहे?
वृंदावन उत्तर प्रदेशात मथुरा जिल्ह्यात आहे, हे एक पवित्र शहर आहे जे कृष्णाशी संबंधित आहे.

वृंदावनाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ कोणता?
वृंदावनाला भेट देण्यासाठी सप्टेंबर ते मार्च या महिन्यांदरम्यानचा काळ उत्तम असतो, कारण या काळात हवामान खूप आल्हाददायक असते.

Web Title: Looking for a cheap place to stay in vrindavan here you will get an ac room for just rs 225 food for rs 65 travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 08:30 AM

Topics:  

  • lifestyle tips
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

सोमवारी शाळा, कॉलेज, ऑफिस कुठेच जावंसं का वाटत नाही? Monday Blues म्हणजे नेमके काय
1

सोमवारी शाळा, कॉलेज, ऑफिस कुठेच जावंसं का वाटत नाही? Monday Blues म्हणजे नेमके काय

उत्तराखंडातील चमत्कारिक धबधबा ज्याच्या पाण्यात दडलेत औषधी गुणधर्म; आंघोळ करताच दूर होतात सर्व रोग
2

उत्तराखंडातील चमत्कारिक धबधबा ज्याच्या पाण्यात दडलेत औषधी गुणधर्म; आंघोळ करताच दूर होतात सर्व रोग

भारतातील असे काही अद्भुत बीच जिथे अनुभवता येतो अविस्मरणीय अनुभव; चांदण्याप्रमाणे चमकत इथल पाणी
3

भारतातील असे काही अद्भुत बीच जिथे अनुभवता येतो अविस्मरणीय अनुभव; चांदण्याप्रमाणे चमकत इथल पाणी

जुन्यातला जुना चामखीळ पण कोणत्याही वेदनाशिवाय गळून पडेल खाली; फक्त या दोन गोष्टी हळदीत मिसळा आणि कमाल पहा
4

जुन्यातला जुना चामखीळ पण कोणत्याही वेदनाशिवाय गळून पडेल खाली; फक्त या दोन गोष्टी हळदीत मिसळा आणि कमाल पहा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.