
हिरव्यागार पेरूंपासून झटपट बनवा चमचमीत पेरूची चटणी
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर पेरू उपलब्ध असतात. पेरूचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. याशिवाय पेरूमध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. सकाळच्या नाश्त्यात नियमित एक पेरू खाल्ल्यास शरीरात कधीच विटामिन सी ची कमतरता कधीच भासणार नाही. कायमच साधा पेरू खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये चमचमीत पेरूची चटणी बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. नियमित पेरू खाल्ल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली विषारी घाण बाहेर पडून जाते. याशिवाय पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी पेरूचे सेवन करावे. चटपटीत पेरूची चटणी तुम्ही कोणत्याही पदार्थासोबत खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया पेरूची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)