
५ मिनिटांमध्ये झटपट बनवा 'मस्कमेलन सॅलड', कडाक्याच्या उन्हाळ्यात पोटाला मिळेल थंडावा
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीराला पाण्याची खूप जास्त आवश्यकता असते. कारण या दिवसांमध्ये शरीरातील पाणी घामावाटे बाहेर पडून जाते आणि आरोग्याला हानी पोहचते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर अचानक चक्कर येणे, अशक्तपणा, थकवा वाढू लागतो. यामुळे काहीवेळा डिहायड्रेशन होते. अशावेळी आहारात वेगवेगळ्या रसाळ आणि पाणीदार फळांचे सेवन करावे. फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. वाढत्या उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर खूप जास्त तहान लागते आणि घसा कोरडा पडतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये खरबुजाची सॅलड बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. सॅलड खाल्ल्यामुळे पोट दीर्घकाळ भरले राहते आणि लवकर भूक लागत नाही. याशिवाय खरबूजमध्ये खूप जास्त पाणी असते. याशिवाय शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या फळांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊन खरबुजाचे सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)