
भाजी खायचा कंटाळा आला आहे? ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा थंडगार कांद्याची कोशिंबीर
बऱ्याचदा जेवणात नेमकी काय भाजी बनवावी? सुचत नाही. कायमच बटाटा, भेंडी, कोबी आणि कडधान्यांच्या भाजी खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी दही आणि वेगवेगळ्या कच्या भाज्यांचा वापर करून कोशिंबीर बनवली जाते. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कोशिंबीर खायला खूप जास्त आवडते. बिर्याणी किंवा भाताचा कोणताही पदार्थ बनवल्यानंतर कोशिंबीर आवडीने खाल्ली जाते. भातासोबत भाजी किंवा डाळ नको असेल तर तुम्ही कोशिंबीर खाऊ शकता. दह्याचे सेवन शक्यतो दुपारच्या वेळी करावे. संध्याकाळी दही खाऊ नये. विविध प्रकारच्या भाज्या आणि कडधान्यांचा वापर करून कोशिंबीर बनवली जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कांद्याची कोशिंबीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चवसुद्धा सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया कांद्याची कोशिंबीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)