मकरसंक्रती सण होईल आणखीनच स्पेशल! घरच्या घरी झटपट बनवा परफेक्ट गूळपोळी
मकर संक्रांत सणाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी असते तर संक्रांत झाल्यानंतर क्रिक्रांत असते. संक्रांतीच्या दिवशी घरात सुगड पूजन करून गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच काळ्या रंगची साडी नेसूनत्यावर हलव्याचे सुंदर सुंदर दागिने घातले जातात. नवीन वर्षात मकरसंक्रांत सण येतो. यादिवशी तिळगुळांना खूप जास्त महत्व आहे. तिळापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. अनेक घरांमध्ये नैवेद्यात कायमच पुरणपोळी हा पदार्थ बनवला जातो. पण नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही परफेक्ट गूळपोळी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ तुपासोबत किंवा नुसताच खाल्ला जातो. पण बऱ्याचदा तिळाची पोळी बनवताना ती मधेच फुटून जाते आणि पुरण सगळं बाहेर येत. त्यामुळे या सोप्या टिप्स वापरून तुम्ही तिळगुळाची पोळी बनवू शकता. नोट करून घ्या रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
शाही चवीचा जबरदस्त थाट! भिजवलेल्या हिरव्या मुगांपासून बनवा मुघलाई मूगडाळ, पराठासोबत लागेल सुंदर






