तरुण वयात चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी घरीच तयार करा स्किन टाईटनिंग फेसमास्क
सर्वच महिलांना चमकदार आणि अतिशय तेजस्वी त्वचा हवी असते. त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय आणि स्किन केअर ट्रीटमेंट केल्या जातात. तरीसुद्धा त्वचा कोरडी आणि रुक्ष दिसते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यामुळे त्वचा अतिशय निस्तेज आणि काळवंडून जाते. त्वचेची गुणवत्ता काहीशी खराब झाल्यानंतर अनेक वेगवेगळ्या समस्या उद्भवू लागतात. चेहऱ्यावर सतत येणारे पिंपल्स, मुरूम आणि फोड त्वचा अतिशय खराब करून टाकतात. त्यामुळे त्वचेची योग्य काळजी घ्यावी. हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.चेहऱ्यावर धूळ, मातीचे कण साचून राहिल्यामुळे त्वचेवर चिकटपणा किंवा तेलकटपणा वाढण्याची जास्त शक्यता असते. तेलकट झालेली त्वचा लगेच स्वच्छ न केल्यामुळे चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात.(फोटो सौजन्य – istock)
केस कोरडे झाले आहेत? मग ‘या’ पद्धतीने केसांवर लावा चहाचे पाणी, केसांच्या समस्या होतील कायमच्या गायब
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव आणि आहारात होणाऱ्या बदलांच्या परिणामुळे कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, त्वचा अतिशय निस्तेज दिसणे किंवा त्वचा अतिशय लूज होऊन जाते. यामुळे तरुण वयातच त्वचा म्हातारी झाल्यासारखी वाटू लागते. त्वचेवरील तेल आणि ओलावा कमी झाल्यानंतर चेहरा कोरडा पडून जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी स्किन टाईटनिंग फेसमास्कबनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा मास्क त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी अतिशय प्रभावी ठरतो. यामुळे लूज झालेली त्वचा घट्ट होते आणि त्वचा अतिशय तरुण दिसते.
वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या वाढतात आणि त्वचेवरील तेज कमी होऊन जाते. यासाठी तुम्ही घरच्या घरी फेसमास्क तयार करून त्वचेवर लावू शकता. यामुळे चेहरा अतिशय सुंदर आणि उजळदार दिसेल. फेसमास्क तयार करण्यासाठी अळशीच्या बियांची पावडर, पाणी, तांदुळाचे पीठ आणि मध लागणार आहे. मोठ्या वाटीमध्ये तांदळाचे पीठ आणि अळशीच्या बियांची पावडर घेऊन मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात मध आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून जाडसर पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तशीच ठेवा. यामुळे त्वचेवरील ग्लो वाढण्यास मदत होईल. काहीवेळानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी होतील आणि त्वचा अतिशय सुंदर दिसेल.
आळशीच्या बियांमध्ये असलेले नैसर्गिक घटक त्वचा अतिशय सुंदर आणि उजळदार करण्यासाठी मदत करतात. अळशीच्या बियांचे सेवन केल्यामुळे आरोग्य कायमच निरोगी राहते. याशिवाय लूज झालेली त्वचा घट्ट होऊन सुरकुत्या कमी होतात. तांदळाच्या पिठात असलेले स्टार्च त्वचेला टाईटनेस देतो आणि चेहऱ्याचा ग्लो वाढवतात. त्वचा कायमच हायड्रेट आणि चमकदार ठेवण्यासाठी मधाचा वापर करावा.