सणावाराच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर आलेले डाग कमी करण्यासाठी 'हे' फेसपॅक ठरतील प्रभावी
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना हळदीचा वापर केला जातो. हळदीच्या वापरामुळे पदार्थाचा रंग वाढतो आणि चव वाढण्यास मदत होते. हळदीचा वापर अनेक गोष्टींसाठी केला जातो. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले अनेक वेगवेगळे फेसपॅक वापरले जातात. फेसपॅक लावल्यामुळे त्वचेवरील ग्लो वाढण्यास मदत होते. आयुर्वेदामध्ये हळदीला विशेष महत्व आहे. वातावरणातील बदलांमुळे किंवा आहारात होणाऱ्या बदलांमुळे त्वचेवर सतत पिंपल्स येणे, मुरूम येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून हळदीचा फेसपॅक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हे फेसपॅक त्वचा अतिशय उजळदार होते.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावरील डागांमुळे त्वचा अतिशय निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ फेसपॅक करेल जादुई कमल,त्वचा होईल चमकदार
त्वचेवर वाढलेले पिंपल्सचे डाग कमी करण्यासाठी वाटीमध्ये हळद घेऊन त्यात कच्चे दूध मिक्स करून घ्या. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवर जमा झालेली घाण, डेड स्कीन कमी होण्यास मदत होते. कच्चे दूध त्वचा उजळ्वण्यासाठी मदत करते. १० मिनिट झाल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. यामुळे त्वचेवर वाढलेला कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा अतिशय मऊ, चमकदार होते.
वाटीमध्ये हळद, बेसन आणि गुलाबपाणी टाकून मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून २० मिनिट तसाच ठेवा. यामुळे चेहऱ्यावर वाढलेला तेलकटपणा कमी होईल आणि डाग कमी होण्यास मदत होईल. त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ करण्यासाठी आणि त्वचा चमकदार करण्यासाठी बेसन हळदीचा फेसपॅक लावावा.
दह्यामध्ये असलेले घटक त्वचा कायमच हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात. यासाठी वाटीमध्ये हळद आणि दही एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. यामुळे त्वचेची गुणवत्ता आणि पोत सुधारण्यासाठी मदत होते. हळद चेहऱ्यावर लावल्यामुळे डाग, काळेपणा कमी होऊन त्वचेवर ग्लो वाढतो.
हळद मधाचा फेसपॅक त्वचेला पोषण देण्यास मदत करतो. वाटीमध्ये हळद घेऊन त्यात मध टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. यामुळे त्वचा अतिशय उजळदार दिसेल. हळदीमध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेचा वेगवेगळ्या संसर्गांपासून बचाव करतात. त्वचा चमकदार करण्यासाठी हळद मधाचा फेसपॅक लावावा.