
शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा आवळा आल्याचे सूप
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयीनमध्ये होणारे बदल, जंक फूडचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आरोग्य बिघडल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात, मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. साथीच्या आजारांची लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि आहारात बदल करावा. आहारामध्ये शरीराला पचन होईल अशा पौष्टिक आणि आरोग्यदायी पदार्थ खावेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आवळा आणि आल्याचा वापर करून चविष्ट आणि पौष्टिक सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
आरोग्यासाठी आलं आणि आवळा अतिशय गुणकारी आहेत. आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी शरीरास ऊर्जा देतात, याशिवाय त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतात. आल्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. ज्यामुळे पचनासंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. महागड्या सप्लिमेंट्स किंवा प्रोटीनशेकचे सेवन करण्यापेक्षा घरगुती पदार्थांचा वापर करून बनवलेले पदार्थ खावेत. आवळा आणि आल्याचे सूप प्यायल्यामुळे शरीरातील सर्दी आणि खोकला कमी होईल.