Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अळूवडी, कोथिंबीर वडी नाही यंदा घर बनवून पहा कुरकुरीत कोबीची वडी; चवीला लज्जतदार घरातील सर्वांनाच करेल खुश

कोबीची भाजी खायला आवडत नसेल तर याची कुरकुरीत वडी बनवून पहा. कोबीमध्ये अनेक पोषक घटक असतात जे अनेक आजारांवर मात करण्यास मदत करतात. कोबीची कुरकुरीत वडी तुमच्या जेवणाची चव आणखीनच वाढवेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 22, 2025 | 01:50 PM
अळूवडी, कोथिंबीर वडी नाही यंदा घर बनवून पहा कुरकुरीत कोबीची वडी; चवीला लज्जतदार घरातील सर्वांनाच करेल खुश

अळूवडी, कोथिंबीर वडी नाही यंदा घर बनवून पहा कुरकुरीत कोबीची वडी; चवीला लज्जतदार घरातील सर्वांनाच करेल खुश

Follow Us
Follow Us:

वडी हा महाराष्ट्राचा एक लोकप्रिय आणि पारंपरिक असा पदार्थ आहे. तुम्ही आजवर अनेकदा अळूवडी किंवा कोथिंबीर वडी खाल्ली असेल मात्र तुम्ही कधी कोबीची वडी खाल्ली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कोबीच्या भाजीपासून तयार केलेली ही वडी चवीला फार अप्रतिम लागते. कोबीमध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे आजरांवर मात करण्यास मदत करतात. तुम्हाला कोबीची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही यापासून कुरकुरीत आणि चविष्ट अशी कोबीची वडी तयार करू शकता.

दुपारच्या जेवणाची चव लागेल सुंदर! झटपट घरी बनवा चमचमीत टोमॅटोचे भरीत, नोट करून घ्या रेसिपी

कोबीची वडी ही एक पारंपरिक आणि चविष्ट महाराष्ट्रीयन डिश आहे. ही वडी कोबी आणि बेसनाचे मिश्रण वापरून तयार केली जाते. कुरकुरीत, मसालेदार आणि पौष्टिक असलेल्या या वड्या चहा सोबत खायला फारच छान लागतात. खास करून पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांत गरमागरम कोबी वड्या म्हणजे एक अप्रतिम स्नॅक आहे. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • कोबी (किसलेली) – 2 कप
  • बेसन – 1 कप
  • तांदळाचे पीठ – 2 टेबलस्पून
  • आलं-लसूण पेस्ट – 1 टेबलस्पून
  • हिरवी मिरची पेस्ट – 1 टेबलस्पून
  • हळद – ½ टीस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • जिरे – ½ टीस्पून
  • हिंग – 1 चिमूट
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर – 2 टेबलस्पून (बारीक चिरलेली)
  • तेल – तळण्यासाठी
लहान मुलांच्या आवडीचा Oreo Shake आता घरीच बनवा; अवघ्या 5 मिनिटांची रेसिपी

कृती

  • कोबीची वडी तयार करण्यासाठी सर्वप्रथम कोबी धुवून चिरून घ्या
  • यांनतर एका भांड्यात किसलेली कोबी, बेसन, तांदळाचे पीठ आणि सर्व मसाले घाला.
  • त्यात आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर आणि मीठ मिसळा.
  • सर्व साहित्य नीट मिक्स करून घट्टसर पीठ भिजवा. गरज असेल तर थोडंसं पाणी घालू शकता.
  • आता एका वाफवण्याच्या पात्राला तेल लावून त्यात हे मिश्रण थापून घ्या.
    वाफेवर १५-२० मिनिटं शिजवा.
  • थंड झाल्यावर त्या वडीचे चौकोनी किंवा आपल्या आवडीच्या आकारात तुकडे करा.
  • कढईत तेल गरम करून हे तुकडे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • तुम्ही या वड्या एअर फ्रायमध्ये देखील शिजवू शकता.
  • तयार वडी पुदिनीची चटणी किंवा नारळाच्या चटणीसह खाण्यासाठी सर्व्ह करा.

Web Title: Make cripsy cabbage vadi at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 01:49 PM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
1

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
2

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी
3

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
4

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.