दुपारच्या जेवणाची चव लागेल सुंदर! झटपट घरी बनवा चमचमीत टोमॅटोचे भरीत
सुट्टीच्या दिवशी दुपारच्या जेवणात नेहमीच काय बनवावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. रविवारच्या दिवशी घरात मच्छी, चिकन किंवा इतर शाहाकारी पदार्थ बनवले जातात. मात्र हल्ली पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मच्छी उपलब्ध नसते. अशावेळी चमचमीत टोमॅटोचे भरीत बनवू शकता. घरात नेहमीच वांग्याचे भरीत, कारल्याचे भरीत किंवा शिमला मिरचीचे भरीत बनवले जाते. यासोबतच तुम्ही टोमॅटोचे सुद्धा भरीत बनवू शकता. चवीला आंबटगोड असलेल्या टोमॅटोपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. मात्र नेहमीच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. टोमॅटोचा वापर डाळ,भाजी, पुलाव इत्यादी सर्वच पदार्थ बनवताना केला जातो. टोमॅटोचे भरीत तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता.(फोटो सौजन्य – pinterest)
पारंपरिक उड्डपी स्टाईल परफेक्ट शेवग्याचे सांबार आता घरीच बनवा, इडली डोसासोबत लागेल चविष्ट
राजमा खायला आवडत नसेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा कुरकुरीत राजमा टॅकोज, नोट करून घ्या रेसिपी