Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : नाश्ता बनेल पौष्टिक! उरलेल्या डाळीपासून सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट पराठा

Leftover Dal Paratha Recipe : उरलेल्या डाळीपासून बनवलेले हे पराठे फक्त उरलेलं अन्नच वाया जाण्यापासून वाचवत नाहीत, तर चवदार आणि पोषक नाश्त्याचा पर्याय बनतात. पुढच्यावेळी डाळ उरली तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 02, 2025 | 03:40 PM
Recipe : नाश्ता बनेल पौष्टिक! उरलेल्या डाळीपासून सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट पराठा

Recipe : नाश्ता बनेल पौष्टिक! उरलेल्या डाळीपासून सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट पराठा

Follow Us
Follow Us:
  • अनेक घरांमध्ये डाळ आवर्जून बनवली जाते, पण हिच डाळ शिळी झाली की तिला फेकून दिली जाते
  • या उरलेल्या डाळीपासून तुम्ही चवदार असे पराठे तयार करु शकता
  • उरलेल्या डाळीपासून तयार केलेले हे पदार्थ चविष्टच लागत नाही तर आरोग्यासाठी पाैष्टकही ठरतात
आपल्या स्वयंपाकघरात नेहमीच काही ना काही उरलेले अन्न असते, आणि त्यातील एक सर्वसामान्य पदार्थ म्हणजे “डाळ”. डाळ पौष्टिक असते, प्रथिनांनी भरलेली असते आणि शरीराला ऊर्जा देते. पण अनेक वेळा आपण रात्री केलेली डाळ दुसऱ्या दिवशी खायची इच्छा नसते. अशावेळी ही उरलेली डाळ वापरून आपण एक स्वादिष्ट आणि झटपट बनणारा नाश्ता तयार करू शकतो, तो म्हणजे उरलेल्या डाळीचे पराठे. हे पराठे फक्त चविष्टच नाहीत तर पौष्टिक देखील आहेत. सकाळच्या नाश्त्यासाठी, डब्यातील पदार्थ म्हणून किंवा संध्याकाळच्या हलक्या जेवणासाठीही हे उत्तम पर्याय आहेत. उरलेल्या डाळीत आधीच मसाले असतात, त्यामुळे पराठ्याला खास चव येते. हे पराठे घरातील सर्वांनाच खुश करतील. चला तर मग पाहूया ही सोपी आणि झटपट रेसिपी.

सध्या जेवणाची चव वाढवेल झणझणीत अन् चटपटीत ‘मसाला मिरची’; जाणून घ्या रेसिपी

साहित्य:

  • उरलेली डाळ – १ कप
  • गव्हाचे पीठ – २ कप (गरजेनुसार)
  • बारीक चिरलेला कांदा – १
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – २ टेबलस्पून
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची – १
  • आले-लसूण पेस्ट – १ टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • लाल तिखट – ½ टीस्पून
  • मीठ – चवीप्रमाणे
  • तेल किंवा तूप – भाजण्यासाठी
तांदूळ डाळीचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये नाश्त्यासाठी बनवा लुसलुशीत व्हेजिटेबल इडली! नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम उरलेली डाळ एका भांड्यात घ्या. ती घट्ट नसेल तर थोडे पीठ वाढवावे, आणि जर फार घट्ट असेल तर थोडे पाणी घालून मऊसर करावे.
  • त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची, आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट आणि मीठ घाला. सगळं एकत्र चांगलं मिसळा.
  • गव्हाचे पीठ त्यात घालून सर्व घटक एकत्र मळा. थोडं तेल घालून मऊसर पीठ बनवा.
  • मळलेलं पीठ १०-१५ मिनिटे झाकून ठेवा. नंतर छोटे गोळे तयार करा.
  • प्रत्येक गोळा थोड्या पिठात घोळवून पराठ्यासारखा लाटा. फार पातळ नको आणि फार जाडही नको.
  • तवा गरम करून त्यावर लाटलेला पराठा ठेवा. दोन्ही बाजूंनी थोडं तेल किंवा तूप लावून सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.
  • तयार पराठे गरमागरम दही, लोणचं किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.
  • डाळ जर मसालेदार असेल तर पराठ्यात जास्त मसाले घालू नयेत.
  • हे पराठे लहान मुलांसाठीही उत्तम आहेत; त्यात थोडं चीज घातल्यास त्यांना अधिक आवडतील.
  • हे पराठे प्रवासात नेण्यासाठीही उत्तम डबा पदार्थ ठरतात.

Web Title: Make delicious paratha from leftover dal recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • easy food recipes
  • indian food
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
1

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
2

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने
3

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
4

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.