
कार्तिकी एकादशीच्या उपवासानिमित्त १० मिनिटांमध्ये बनवा शेंगदाण्याचे चविष्ट लाडू
कायमच आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचा उपवास न चुकता केला जातो. उपवासाच्या दिवशी कायमच साबुदाणा खिचडी, बटाट्याची भाजी, वरीचा भात इत्यादी ठराविक पदार्थ कायमच बनवले जातात. पण उपाशी पोटी साबुदाण्याचे सेवन केल्यास पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उपवासानिमित्त शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. उपवासाच्या दिवशी शेंगदाणे आणि गूळ आवडीने खाल्ले जाते. शेंगदाणे खाल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. वाढत्या वयात हाडांमध्ये वाढलेल्या वेदना आणि सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी शेंगदाण्याचे सेवन केले जाते.शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळून येते, ज्यामुळे रक्ताची कमतरता भरून निघते. सकाळी उठल्यानंतर नियमित एक लाडू खाल्ल्यास हाडांच्या वेदनांपासून आराम मिळेल आणि शरीर कायमच हेल्दी राहील. चला तर जाणून घेऊया शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Weekend Special : सुगंधित अन् मसालेदार… अवघ्या 30 मिनिटांतच बनवा मंगलोरीयन स्टाईल ‘चिकन घी रोस्ट’