Weekend Special Know How To Make Manglorian Style Chicken Ghee Roast At Home Recipe In Marathi
Weekend Special : सुगंधित अन् मसालेदार… अवघ्या 30 मिनिटांतच बनवा मंगलोरीयन स्टाईल ‘चिकन घी रोस्ट’
Chicken Ghee Roast Recipe : कर्नाटकातील मंगळूर येथे चिकन घी रोस्ट हा स्वादिष्ट पदार्थ फार फेमस आहे. तूपात शिजवलेले मसालेदार चिकन अशी या पदार्थाची ओळख आहे. चला हा पदार्थ घरी कसा तयार करायचा ते जाणून घेऊया.
कर्नाटकातील मंगळूर येथे ‘चिकन घी रोस्ट’ हा पदार्थ फार फेमस आहे
तुपात शिजवलेले मसालेदार चिकन अशी या पदार्थाची ओळख आहे
हा पदार्थ पाहचा क्षणीच तोंडाला पाणी आणणारा आहे
कोकण आणि दक्षिण भारतातील जेवण म्हटलं की त्यात मसाले, खोबरे आणि तुपाचा मोहक सुगंध असतो. अशाच स्वादांनी भरलेला एक प्रसिद्ध पदार्थ म्हणजे “चिकन घी रोस्ट.” हा पदार्थ मूळतः कर्नाटकातील मंगळूर परिसरातून आलेला आहे. तिथल्या प्रत्येक घरात आणि रेस्टॉरंटमध्ये याचा सुगंध दरवळत असतो. याच्या नावातच त्याचं सार आहे, भरपूर तुपात भाजलेले चिकन आणि खास मसाल्यांचा तिखट पण मनमोहक संगम. चिकन घी रोस्टचा रंग लालसर असतो, पण त्याची चव फक्त तिखट नसून थोडीशी गोडसर, आंबट आणि सुगंधी असते. हे डिश बनवताना मसाले भाजण्याची प्रक्रिया आणि तुपाचा वापर यामुळे त्याचा चविष्टपणा दुपटीने वाढतो. हा पदार्थ फक्त दिसायलाच नाही तर चावीलाच लाजवाब लागतो. आज आम्ही या लेखात तुम्हाला पारंपरिक पद्धतीने मंगळोरी पद्धतीने चिकन घी रोस्ट घरी कसे तयार करायचे ते सांगणार आहोत. चला या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
यासाठी सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुऊन त्यात दही, लिंबाचा रस, हळद आणि मीठ टाकून नीट मिक्स करा. ते किमान एक तास मॅरिनेट होऊ द्या.
कढईत धणे, जिरे, मेथी दाणे, काळीमिरी, लवंग आणि दालचिनी कोरडे भाजून घ्या. सुगंध आला की गॅस बंद करा. थोडं थंड झाल्यावर या मसाल्यांसोबत लाल मिरच्या, लसूण आणि चिंच घालून पाणी न वापरता घट्ट पेस्ट तयार करा.
एका जाड बुडाच्या कढईत तूप गरम करा. त्यात कढीपत्ता घाला. नंतर मॅरिनेट केलेले चिकन घालून 8 ते 10 मिनिटे परतून घ्या. चिकन थोडं शिजल्यावर त्यात तयार केलेला मसाला घाला.
मसाला चिकनवर नीट मिक्स करा आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवा. तुपात मसाला हळूहळू भाजला गेला की त्याचा रंग गडद लाल होतो आणि तुपाचे बुडबुडे दिसू लागतात.
मसाला चिकनला पूर्ण लागला की गॅस कमी करा आणि 10 मिनिटे परतत शिजवा. चिकन कोरडे पण रसाळ होईल.
गॅस बंद केल्यावर वरून थोडं तूप घालून मिसळा. सुगंधित चिकन घी रोस्ट सर्व्ह करण्यास तयार आहे.
हा पदार्थ साध्या गरम भातासोबत, नेर डोसे, पराठा किंवा फुलक्यासोबत उत्कृष्ट लागतो. त्याची चव अधिक खुलते जेव्हा तो ताज्या तुपात बनवला जातो. हा डिश बनवताना मसाला नीट भाजणे आणि त्याची योग्य प्रमाणात आंबट-तिखट चव राखणे हेच त्याचे वैशिष्ट्य आहे.
चिकन घी रोस्ट हा फक्त एक पदार्थ नाही, तर दक्षिण भारतीय पाककलेचा अनुभव आहे. त्याचा प्रत्येक घास तुपाच्या समृद्ध सुगंधाने आणि मसाल्यांच्या जोमदार चवीने मन जिंकतो. हा पदार्थ एकदा घरी बनवलात की पुन्हा पुन्हा करण्याची इच्छा निर्माण होते.
Web Title: Weekend special know how to make manglorian style chicken ghee roast at home recipe in marathi