
१० मिनिटांत लहान मुलांसाठी बनवा चमचमीत मसालेदार अंड्याचे काप
जेवणाच्या ताटात डाळभात पाहिल्यानंतर लहान मुलं जेवण्यास नकार देतात. मुलांना कायमच जेवणात चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. बिर्याणी, पिझ्झा, बर्गर इत्यादी अनेक पदार्थ लहान मुलं खूप आवडीने खातात. पण घरातील भाजी चपाती, डाळभात खाण्यास कायमच नकार देतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जेवणात तोंडी लावण्यासाठी झणझणीत अंड्याचे मसालेदार काप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. अंड्याचे काप चवीला अतिशय सुंदर लागतात. गरमागरम भाकरी, चपाती किंवा डाळभातासोबत अंड्याचे काप चविष्ट लागतात. नेहमीच साधं अंड खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही अंड्याचे काप बनवू शकता. हे काप तुम्ही नुसतेच सुद्धा खाऊ शकता. अंड खाणे शरीरासाठी अतिशय पौष्टिक मानले जाते. अंड्यात असलेले गुणकारी घटक शरीराला ऊर्जा देतात. सकाळच्या नाश्त्यात नियमित दोन अंडी खाल्ल्यास महिनाभरात वजन वाढेल आणि तुम्ही कायमच फिट दिसाल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)