अजिबात भासणार नाही चटणीची गरज! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा लालचुटुक टोमॅटोचा चविष्ट डोसा
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं, हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. कामाच्या धावपळीमध्ये बऱ्याचदा नाश्ता बनवण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. सतत काम करत राहिल्यामुळे नाश्त्याची वेळ चुकून जाते आणि कोणताही पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. अशावेळी नाश्त्यात झटपट तयार होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. सकाळच्या नाश्त्यात सगळ्यांचं हेल्दी पण कमीत कमी साहित्यात तयार होणारे पदार्थ खाण्यास हवे असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाटीभर टोमॅटोच्या गरापासून कुरकुरीत डोसा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. डोसा, इडली हे पदार्थ दक्षिण भारतीय संस्कृतीमधील अविभाज्य घटक आहेत. कायमच साधा डोसा आणि त्यासोबत खोबऱ्याची चटणी किंवा सांबार खाल्ले जाते. पण नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी नाश्त्यात टोमॅटो डोसा बनवावा. हा पदार्थ अतिशय कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि जास्त साहित्यसुद्धा लागत नाही. टोमॅटो डोसासोबत तुम्हाला कोणतीही चटणी बनवण्याची आवश्यकता नाही. चला तर जाणून घेऊया टोमॅटो डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
हिरव्यागार पेरूंपासून झटपट बनवा चमचमीत पेरूची चटणी, लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील पदार्थ






