
१० मिनिटांत लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा चमचमीत पालक पॅनकेक
लहान मुलं हिरव्या पालेभाज्या अजिबात खात नाहीत. पालेभाज्यांचे नाव ऐकल्यानंतर नाक मुरडतात आणि ताटात वाढलेल्या भाज्या फेकून देतात. पण दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी आणि हाडांची लवचिकता सुधारण्यासाठी पालेभाज्यांचे सेवन करावे. मेथी, पालक, मुळा, शेपू इत्यादी भाज्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहेत. लहान मुलांच्या वाढीसाठी आहारात पालेभाज्या खाणे अतिशय महत्वाचे आहे. पालेभाज्यांमध्ये असलेले विटामिन, फायबर आणि निरोगी फॅट्स शरीराला भरपूर पोषण देतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या डब्यासाठी पालक पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पालक पॅनकेक लहान मुलांच्या डब्यात, बाहेर फिरायला जाताना नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर तुम्ही पालक पॅनकेक बनवू शकता. लहान मुलांमध्ये थकवा, चिडचिड किंवा भूक न लागणे यांसारख्या समस्या लोहाच्या कमतरतेमुळे उद्भवतात. त्यामुळे मुलांना आहारात कायमच लोह आणि विटामिन असलेल्या पदार्थांचे सेवन करण्यास द्यावे. पॅनकेक हा पदार्थ सर्वच लहान मुलं खूप जास्त आवडीने खातात. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
लाडवांची झंझट सोडा यंदाच्या मकर संक्रांतीला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग ‘तिळाची पापडी’