
थंडगार वातावरणात संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी बाजरीच्या पिठाच्या हलवा
थंडीत शरीराला भरपूर पोषणाची आवश्यकता असते. त्यामुळे रोजच्या आहारात अनेक उष्ण पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. उष्ण पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि आजारांपासून शरीराचा बचाव होतो. थंडीत साथीचे आजार वाढू लागल्यानंतर शरीरात थकवा, अशक्तपणा मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यामुळे नाश्त्यात किंवा जेवणात विकतचे पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या पौष्टीक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बाजरीच्या पिठापासून गोड हलवा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. यापूर्वी तुम्ही बाजरीच्या पिठाची भाकरी किंवा थालीपीठ खाल्ले असेल. बाजरीमध्ये कॅल्शियम, आयर्न, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि प्रोटीन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. नियमित बाजरीचे सेवन केल्यास शरीराची पचनक्रिया मजबूत राहील, शरीरात कायम उष्णता टिकून राहील आणि आरोग्याला भरमसाट फायदे होतील. हिवाळ्यात आहारामध्ये बाजरी, ज्वारी, नाचणी इत्यादी धान्यांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया बाजरीचा हलवा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)