दिवाळीत सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी टेस्टी पनीर टोस्ट
दिवाळीत घरातील सर्वच सदस्यांना सुट्टी असते. सुट्टीच्या दिवशी नाश्त्यात नेमकं काय बनवावं? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं पडतात. कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. कारण दिवाळीमधील तेच तेच फराळातील पदार्थ खायला काहींना आवडत नाही. फराळातील पदार्थांचे अतिसेवन केल्यास अपचन, ऍसिडिटी किंवा गॅस होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे नाश्त्यात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हेल्दी टेस्टी पनीर टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीर खायला खूप जास्त आवडते पनीरपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी तुम्ही पनीर टोस्ट बनवू शकता. वाढलेले वजन कमी करताना आहारात पनीर खाल्ले जाते. यामुळे वजन नियंत्रणात राहते. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये पनीर टोस्ट बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)