Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हेल्दी पण चविष्ट असं काही खायचंय? मग आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करा ‘मलाई ब्रोकली’, रेसिपी आहे फार सोपी

Malai Broccoli Recipe: डाएटमध्ये नेहमी बेचव पदार्थ खाण्याची गरज नाही. तुम्ही स्मार्ट पद्धतीने हेल्दी पदार्थांनाही चविष्ट ट्विस्ट देऊ शकता. मलाई ब्रोकोली एक हाय प्रोटीन डिश आहे जी चवीलाही अप्रतिम लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 21, 2026 | 10:14 AM
हेल्दी पण चविष्ट असं काही खायचंय? मग आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करा 'मलाई ब्रोकली', रेसिपी आहे फार सोपी

हेल्दी पण चविष्ट असं काही खायचंय? मग आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करा 'मलाई ब्रोकली', रेसिपी आहे फार सोपी

Follow Us
Follow Us:
  • मलाई ब्रोकली एक टेस्टी आणि हेल्दी डिश आहे.
  • यात ब्रोकोलीला क्रिमी साॅसमध्ये मॅरिनेट करुन शिजवले जाते.
  • ही डिश चवीला फार अप्रतिम लागते.
आजकाल हेल्दी खाण्याकडे सगळ्यांचा कल वाढतोय, पण “हेल्दी म्हणजे चव नसलेलं” असा गैरसमज अजूनही अनेकांच्या मनात आहे. खरं तर योग्य साहित्य आणि थोडी कल्पकता वापरली, तर चवदार आणि पौष्टिक असा उत्तम मेनू तयार करता येतो. त्यातच ब्रोकलीसारखी भाजी ही प्रोटीन, फायबर आणि व्हिटॅमिन्सने भरलेली असल्यामुळे फिटनेस जपणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरते.

आंध्रप्रदेशात प्रत्येक घरी ‘या’ पद्धतीने बनवली जाते कच्च्या कैरीची आंबटगोड पारंपरिक चटणी, उन्हाळ्यात वाढेल जेवणाची चव

मलाई ब्रोकली ही साधारणपणे रेस्टॉरंटमध्ये स्टार्टर म्हणून मिळते, पण ती थोड्या बदलांसह घरीही बनवता येते आणि अधिक हेल्दी पद्धतीने बनते.  ही रेसिपी संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी, पार्टी स्टार्टरसाठी किंवा डाएटमध्ये हेल्दी पर्याय म्हणूनही उत्तम आहे. विशेष म्हणजे, ही बनवायला सोपी असून वेळही कमी लागतो.

साहित्य:

  • 2 कप ब्रोकलीचे मध्यम तुकडे
  • 1/2 कप हंग कर्ड (चक्का)
  • 1/2 कप पनीर (किसलेले)
  • 2 टेबलस्पून काजू पेस्ट
  • 1 टेबलस्पून क्रीम (ऑप्शनल)
  • 1 टीस्पून आले-लसूण पेस्ट
  • 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर
  • 1/2 टीस्पून गरम मसाला
  • 1 टीस्पून लिंबाचा रस
  • मीठ चवीनुसार
  • 1 टेबलस्पून तेल किंवा बटर
कडक उन्हाळ्यात पाहुण्यांच्या स्वागतासाठी बनवा गोकर्णच्या फुलांपासून रेस्टॉरंट स्टाईल Blue Lagoon Mocktail

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम ब्रोकली स्वच्छ धुवून उकळत्या पाण्यात 2–3 मिनिटे ब्लांच करा आणि लगेच थंड पाण्यात टाका. त्यामुळे रंग आणि कुरकुरीतपणा टिकतो.
  • एका बाउलमध्ये हँग कर्ड, पनीर, काजू पेस्ट आणि क्रीम एकत्र करून स्मूथ मिश्रण तयार करा.
  • त्यात आले-लसूण पेस्ट, काळी मिरी, गरम मसाला, मीठ आणि लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करा.
  • आता पाण्यात काहीवेळ वाफवून मग ब्रोकलीला या मिश्रणात घाला आणि हलक्या हाताने मसाला यावर कोट करा. याला 10–15 मिनिटे मॅरिनेट होऊ द्या.
  • पॅनमध्ये थोडं तेल किंवा बटर गरम करा. त्यात मॅरिनेट केलेली ब्रोकली मध्यम आचेवर शॅलो फ्राय करा.
  • ब्रोकलीला हलका गोल्डन रंग येईपर्यंत शिजवा. मध्ये मध्ये हलवत राहा.
  • गरमागरम मलाई ब्रोकली प्लेटमध्ये काढा आणि वरून थोडी काळी मिरी किंवा चाट मसाला शिंपडा.
  • ही डिश ग्रीन चटणी किंवा हंग कर्ड डिपसोबत सर्व्ह केली, तर चव आणखी वाढते.
  • जास्त प्रोटीनसाठी पनीरचे प्रमाण वाढवू शकता.
  • ओव्हनमध्ये 200°C वर 15 मिनिटे बेक करूनही ही रेसिपी हेल्दी बनवता येते.

Web Title: Make high protein malai broccoli at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • healthy food
  • healthy recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : नाश्ता जो सर्वांना करेल खुश, घरी बनवा मुंबईची फेमस स्ट्रीट स्टाईल पावभाजी; नोट करा रेसिपी
1

Recipe : नाश्ता जो सर्वांना करेल खुश, घरी बनवा मुंबईची फेमस स्ट्रीट स्टाईल पावभाजी; नोट करा रेसिपी

नियमित करा चमचाभर जवस बियांचे सेवन, वजन नियंत्रणात राहण्यासोबतच शरीरातील हाडे होतील मजबूत
2

नियमित करा चमचाभर जवस बियांचे सेवन, वजन नियंत्रणात राहण्यासोबतच शरीरातील हाडे होतील मजबूत

Recipe : वजन वाढत नाहीये? मग आहारात करा या शेकचा समावेश, महिनाभरात वजनात होईल वाढ
3

Recipe : वजन वाढत नाहीये? मग आहारात करा या शेकचा समावेश, महिनाभरात वजनात होईल वाढ

रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कायमचे वाढते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ हिरव्या भाज्यांचा समावेश
4

रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कायमचे वाढते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ हिरव्या भाज्यांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.