
भिजवलेल्या हिरव्या मुगांपासून बनवा मुघलाई मूगडाळ
जेवणाच्या ताटात कायमच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. हिरवे मूग आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असतात. सकाळच्या नाश्त्यात भिजवलेल्या हिरव्या मुगांपासून सॅलड, सूप किंवा मुगाची भाजी बनवली जाते. जेवणाच्या डब्यात मुगाची भाजी असेल तर लहान मुलांसह मोठेसुद्धा भाजी खाण्यास नकार देतात. भाजी खायला अनेकांना आवडत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला भिजवलेल्या हिरव्या मुगांपासून मुघलाई मूगडाळ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्य आणि कमी वेळात झटपट तयार होतो. मुघलाई मूगडाळ तुम्ही पराठा, चपाती, भात किंवा इतर कोणत्याही पराठ्यासोबत खाऊ शकता. मुगाची डाळ किंवा हिरवे मूग सहज पचन होतात. त्यामुळे लहान मुलांच्या जेवणात मुलांसाठी हा पदार्थ बनवू शकता. कामाच्या धावपळीमध्ये कायमच जेवणासाठी काय बनवावे, बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी मुघलाई मूगडाळ हा पदार्थ अतिशय उत्तम आहे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)