Winter Special Know How To Make Healthy And Beneficial Moringa Flower Subji At Home Recipe In Marathi
हिवाळ्यात आरोग्यदायी… वात, डोकेदुखी, सांधेदुखी कमी करणारी पौष्टिक शेवग्याच्या पानांची भाजी; चवीलाही लागते मजेदार
Moringa Flower Subji Recipe : तुम्हाला माहिती आहे का? शेवग्याच्या शेंगाच नाही तर त्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांचीही चविष्ट भाजी तयार केली जाते. ही भाजी आरोग्याच्या अनेक समस्यांना पळवून लावायला मदत करते.
शरीराला मजबूत ठेवायचं असेल तर आहारात शेवग्याच्या भाजीचा समावेश भरपूर फायद्याचा ठरेल.
ही भाजी फार निवडक साहित्यापासून तयार केली जाते आणि चवीलाही फार छान लागते.
हिवाळा आला की शेवग्याच्या झाडांना भरघोस फुलं येतात. ही नाजूक फुलं किंचित गोडसर चवीची असतात आणि विदर्भ, मराठवाडा तसेच खानदेशात खास आवडीने खाल्ली जातात. केवळ चवीलाच नव्हे तर पोषणमूल्यांनाही ही फुलं खूप समृद्ध आहेत. शेवग्याच्या फुलांमध्ये कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असून व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सही आढळतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, पचन सुधारणे आणि शरीराला ताकद देण्यासाठी ही भाजी अत्यंत उपयुक्त मानली जाते. घरगुती पद्धतीने कमी वेळात तयार होणारी ही भाजी तुम्ही रोजच्या आहारात सहज समाविष्ट करू शकता. चला तर मग शेवग्याच्या फुलांची भाजी कशी तयार करायची याची सोपी रेसिपीनोट करूयात.
सर्वप्रथम शेवग्याची फुलं नीट निवडून घ्या. ती स्वच्छ पाण्यात धुवून घ्या आणि जाड देठ वेगळे करून फुलं मध्यम आकारात कापून ठेवा.
आता कढई गॅसवर ठेवा आणि त्यात तेल गरम करा. तेल चांगले तापले की जिरे घालून फोडणी द्या. जिरे तडतडू लागले की त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला आणि थोडं परता.
यानंतर कांदा घालून मध्यम आचेवर गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. कांदा मऊ झाल्यावर त्यात हळद आणि मीठ घाला. सर्व मिश्रण नीट ढवळून घ्या.
आता कापलेली शेवग्याची फुलं कढईत घाला. झाकण ठेवून ही भाजी ५ ते १० मिनिटे वाफेवर शिजू द्या. मधूनमधून हलवत राहा, गरज असल्यास फारच थोडं पाणी शिंपडू शकता.
फुलं मऊ शिजली की गॅस बंद करा. शेवटी वरून ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी हलक्या हाताने मिसळा.
ही चविष्ट आणि पौष्टिक शेवग्याच्या फुलांची भाजी गरमागरम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा साध्या
पोळीबरोबर अतिशय छान लागते. कमी तेलात तयार होणारी ही भाजी आरोग्यदृष्ट्या फायदेशीर असून हिवाळ्यात नक्कीच करून पाहावी अशी आहे.
Web Title: Winter special know how to make healthy and beneficial moringa flower subji at home recipe in marathi